टाकळीमियॉ ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व ग्रामस्थांच्यावतीने डॉ.आंबेडकर जयंती साजरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, April 17, 2021

टाकळीमियॉ ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व ग्रामस्थांच्यावतीने डॉ.आंबेडकर जयंती साजरी

 टाकळीमियॉ ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व ग्रामस्थांच्यावतीने डॉ.आंबेडकर जयंती साजरी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
टाकळीमियाँ ः देशात अनेक महापुरुष होऊन गेले परंतु समाजात एक विद्रोही मानसिकता तयार झाली आहे महापुरूषांनी कधीही जाती धर्मामध्ये भेदभाव केला नाही तेव्हा आपण सर्वांनी अशा महापुरूषांचा गरजेसाठी वापर करू नका असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर नगर जिल्ह्याचे संघचालक भरत निमसे यांनी केले ते महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रमा दरम्यान मार्गदर्शन करताना बोलत होते.
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व ग्रामस्थ यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब  आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
आपण समजतो छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्माचे, डॉ आंबेडकर दलित समाजाचे असे म्हणून आपण आपल्यात फुट पाडून घेतो शिवाजी महाराजांनी आठरापगड जातींना बरोबर घेतल्याने त्यांना स्वराज्याची स्थापना करता आली तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहीताना सर्व जाती धर्माचा व समाजातील सर्व घटकांचा विचार करून सर्वाना न्याय मिळाला पाहिजे कायदा सर्वासाठी समान असला पाहिजे असा सर्व समावेशक विचार करून देशाची घटना लिहीली अशा महापुरूषांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले त्यांनी कधीही कोणत्या जाती धर्माचा तिरस्कार केला नाही आपण सर्व एक आहोत हाच विचार केल्याने ते महामानव झाले. हिंदू समाजातील अस्पृश्यता घालवण्याचे प्रचंड प्रयत्न करूनही त्यात यश येत नाही असे लक्षात आल्यानंतर त्यांनी ‘मी जन्माने जरी हिंदू असलो तरी मरताना हिंदु म्हणुन मरणार नाही’, अशी भिम प्रतिज्ञा केली  त्यानंतर मुस्लिम व अनेक ख्रिश्चन धर्म गुरूंनी त्यांना आपल्या धर्मात येण्यासाठी अनेक प्रलोभने दाखवूनही त्यांनी शेवटी भारतीय मातीत जन्माला आलेल्या बौद्ध धर्माचा स्वीकार करून अखिल हिंदू समाजावर व राष्ट्राला उपकार च केला असे सांगून ते म्हणाले की, अशा थोर पुरुषांचे थोर आदर्श तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम जयंती साजरी करून झाले पाहिजे मात्र आंबेडकर चळवळीचे नेते आंबेडकर यांचे नाव घेऊन अनेक गोष्टी करतात मात्र बाबासाहेब जसे वागले तसे वागण्याचा प्रयत्न करीत नाही त्यांनी तो करावा असे   श्री निमसे म्हणाले.
  या कार्यक्रमास उपसरपंच सुभाष जुंदरे भाजप चे राजेंद्र करपे, संदीप विधाटे, शिवा माने अक्षय करपे,पो.पाटील नामदेव जगधने,   आर पी आय चे  सिद्धांत सगळगिळे, काँग्रेसचे बाळासाहेब सगळगिळे, सचिन सगळगिळे, प्रशांत जगधने आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here