गरजूंना कोरोनामुळे पोट कसे भरायचा हा प्रश्न ः पवार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 17, 2021

गरजूंना कोरोनामुळे पोट कसे भरायचा हा प्रश्न ः पवार

 गरजूंना कोरोनामुळे पोट कसे भरायचा हा प्रश्न ः पवार

गावागावात शिवभोजन थाळी  सुरु करा, मनसेची मागणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः  महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव झाल्यामुळे महाविकासआघाडीने राज्यात लॉकडाउनचा निर्णय घेतला. यामुळे मोलमजुरी करणार्यांवर मोठे संकट उभे राहिले आहे. कुठल्याही प्रकारची प्रत्यक्ष आर्थिक मदत न मिळाल्यामुळे हातावर पोट भरणार्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे शासनाने चालु केलेली शिवभोजन थाळी गावागावात तात्काळ चालु करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.आज काम केले तर उद्या काय खायचे अशा परीस्थितीत गोरगरीब गरजुंना कोरोनामुळे  पोट कसे भरायचा असा गंभिर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा नागरिकांचा पोटाचा प्रश्न तात्काळ सोडवावा,आज शासकीय आरोग्य विभागाचे कर्मचारी जीवावर उदार होवुन आपल्यासाठी संघर्ष करत आहे अशा शासकीय आरोग्य कर्मचार्यांच्या परिवाराच्या लसिकरणासह काही आपत्ती निर्माण झाल्यास त्याची आर्थिक स्वरुपात संपुर्ण जबाबदारी शासणाणे स्वीकारुन त्यांच्यासाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था करावी जेणे करुन त्यांच्या संघर्षात घरच्यांना कोरोनाच्या संकटाला सामोरे जावे लागेल.
त्याचबरोबर पारनेरला आरोग्य विभागात घेण्यात येणार्या कंत्राटी कामगारांचे विम्यासह लसिकरण करावे व कोविड सेंटरमध्ये विनामास्क वावरणार्यांवर कठोर गुन्हा दाखल करावा जेणे करुन कोरोना संसर्ग सर्वसामांन्यांना होणार नाही अशा विविध मागण्यांचे लिखित पत्र मनसेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी परिस्थितीचे गांभिर्य पाहुन पारनेच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना तातडीने पाठवीले आहे.
निवेदनावर अविनाश पवार मनसे तालुका उपाध्यक्ष पारनेर व सतीश म्हस्के यांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment