इतर क्षेत्रांचा ऑक्सीजन पुरवठा बंद करुन रुग्णालयांना द्यावा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 17, 2021

इतर क्षेत्रांचा ऑक्सीजन पुरवठा बंद करुन रुग्णालयांना द्यावा.

 इतर क्षेत्रांचा ऑक्सीजन पुरवठा बंद करुन रुग्णालयांना द्यावा.

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना पोपट पवारांचे निवेदन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अत्यवस्थ रुग्णांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन, व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाही. रुग्णालयांनाही वेळेत व पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. त्यामुळे भयावह परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. समाजाला जगण्याच्या दृष्टीने इतर क्षेत्रांचा ऑक्सिजन पुरवठा बंद करून तो फक्त रुग्णालयांसाठी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे.
सध्या शिस्ती बाबत उपाय योजना करण्याची गरज आहे. शासकीय यंत्रणेला दुखावून काम करणे शक्य नाही, परंतु सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. आपण यासाठी प्रयत्न करत आहात. परंतु माझ्या सारख्या एका छोट्या गावच्या सरपंचाला अनेक क्षेत्रातील व्यक्तींकडून येणार्‍या दूरध्वनीमुळे पत्राद्वारे आपणाकडे ही मागणी करावी लागत असल्याचे शेवटी पवार यांनी पत्रात म्हटले आहे. पत्राच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, ग्राम विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठविण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचीची परिस्थिती भयावह होत आहे. योग्य उपाय योजना न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे असेही निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment