मोटरसायकल चोर गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 17, 2021

मोटरसायकल चोर गजाआड.

मोटरसायकल चोर गजाआड.

तोफखाना पोलीस पथकाची कारवाई..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गेल्या काही दिवसांपासून शहरात मोटारसायकल चोरीच्या घटनेत वाढ झाली असल्याने तोफखाना पोलिसांनी  याची दखल घेवून पेट्रोलिंगची वाढ करीत झडती सत्र, तपासणी मोहीम सुरू केली असता हद्दीमध्ये तपोवन रोडने पेट्रोलिंग करीत असताना दोन इसम विना नंबरच्या पॅशन प्रो मोटर सायकल औरंगाबाद रोडच्या दिशेने जाताना दिसले. त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना रोडवर थांबवून सदर गाडीबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना सदरील गाडी सोबत घेवुन तोफखाना पोलीस स्टेशनला आणुन विश्वासात घेवुन विचारपुस केली असता गणेश देविदास नल्ला वय 23 वर्षे, रा. श्रमिकनगर, बालाजी मंदिराजवळ, प्रविण रावसाहेब भोंडगे वय-27 वर्षे, रा. एमआयडीसी, ही गाडी रंगार गल्ली येथुन चोरल्याची कबुली दिली. तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतुन चोरलेल्या एक स्प्लेंडर मोटार सायकल व एक स्कुटर व एक मोबाईल चोरल्याची कबुली दिल्याने त्याची झाडा झडती घेतली असता त्यांच्याकडे  मोटार सायकल व मोबाईल मिळुन आला आहे.
30 हजार  रू.किं एक हिरो कंपनीची पेंशन प्रो कं.ची काळ्या रंगाची ग्रे रंगाचे पट्टे असलेली तिचा चेसीस नंबर एमबीएलएचए10 ईडब्ल्युबीजीएम 71605 किं.अ. 10 हजार रु.ची एक हिरो होन्डा कं.ची काळ्या
रंगाची मो.सा. तिचा चेसी नं.02018एम02486 असा असलेली किंअं. 20 हजार एक प्लेझर लाल रंगाची तिचा इं.नं.जेएफ16 ईबीएजीएफ 05875 असा असलेली. किं. 8 हजार - एक विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल हॅन्डसेट वरील वर्णनाच्या चोरलेल्या 03 मोटार सायकल व बळजबरीने हिसकावून नेलेला एक मोबाईल यातील आरोपी याचेकडुन हस्तगत करण्यात आला असुन एकुण 03 गुन्हे उघडकीस करण्यात आले आहेत. प्लेझर गाडीच्या मालकाचा शोध घेत आहोत.
दि 14 एप्रिल 2019 रोजी सुद्धा तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत बाळू रामदास शिंदे यांची स्प्लेंडर मोटारसायकल चोरी गेली बाबत तोफखाना पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल होती. या तक्रारीची दखल घेवून
ही कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री. मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली तसेच मा.पोलीस निरीक्षक श्री सुनील गायकवाड सर यांचे सूचना व मार्गदर्शन याप्रमाणे तोफखाना गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके, तसेच तपासी अंमलदार पोलीस जपे, वसिम पठाण, अविनाश वाकचौरे, इनामदार, पोलीस अंमलदार सचिन जगताप, शैलेश गोमसाळे, अनिकेत आंधळे, संतोष राठोड डी बी जपे, पोलीस निरीक्षक समाधान सोळंके, अहमद इनामदार, सचिन जगताप यांचे पथकाने केली आहे.

No comments:

Post a Comment