काही कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’!
मनपा आयुक्तांनी कर्मचार्यांच्या सुरक्षिततेसाठी काढले परिपत्रक.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महापालिका कामगार युनियनकडून मनपा प्रशासनाकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला होता. याची दखल घेवून मनपा आयुक्तांनी काल परिपत्रक काढून काही कर्मचार्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ चे आदेश दिले आहेत.
आयुक्त शंकर गोरे यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे कि, कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होवु नये याकरीता संबधीत खाते प्रमुख/शाखा प्रमुख यांना सुचीत केले आहे. आपापल्या विभागाकडे कार्यरत असलेले कर्मचार्यांपैकी कार्यालयासाठी अत्यावश्यक लागणारे कर्मचारी यांना कार्यालयात कामकाज करण्यासाठी उपस्थित ठेवण्यात यावेत. अत्यावश्यक कर्मचार्यांन व्यतिरिक्त इतर कर्मचार्यांची गरज भासल्यास ‘वर्क फ्रॉम होम’ व्दारे कामकाज पहाण्यास कळवावे. संबधीत कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी बंद राहणार नाही याबाबत सुचना देण्यात याव्यात. घरी राहून कर्मचार्यांनी कामाव्यतिरिक्त निवास्थान सोडुन बाहेर पडु नये, याबाबत तक्रारी आल्यास कडक कारवाई करण्यात येईल. तसेच संबधीत अधिकारी व कर्मचारी यांनी सोशल डिस्टंन्सिंगचा, मास्कचा, सॅनिटायझरचा व हॅण्डग्लोजचा वापर करणेबाबत दक्षता घेण्यात यावी. वरील सुचनाचे पुढील आदेश होईपर्यंत काटेकोरपणे पालन व अंमलबजावणी करावी. परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे सर्व खातेप्रमुख/शाखा प्रमुख यांना कळविले आहे. महानगरपालिका कामगार युनियनने गेल्या आठवड्यात कामगारांच्या सुरक्षिततेसाठी मनपा वरिष्ठ अधिका-यांसमवेत व्यापक बैठक घेतली होती. अध्यक्ष कॉम्रेड अनंत लोखंडे आणि सरचिटणीस कॉम्रेड आनंदराव वायकर यांनी कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीरपणे घेऊन मनपा अधिका-यांना कामगार सुरक्षिततेची अंमलबजावणी करण्याचे कळविले होते. त्या पार्श्वभुमीवर हे परिपत्रक काढल्याची मनपात चर्चा आहे.
No comments:
Post a Comment