रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याबरोबरच सर्व आजारांवर होमिओपॅथीचे अतिशय प्रभावी उपचार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 9, 2021

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याबरोबरच सर्व आजारांवर होमिओपॅथीचे अतिशय प्रभावी उपचार

 रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याबरोबरच सर्व आजारांवर होमिओपॅथीचे अतिशय प्रभावी उपचार

नगर जिल्ह्यात डॉ.बोरा दाम्पत्याची 17 वर्षांपासूनची होमिओपॅथीक उपचार सेवा रूग्णांसाठी ठरतेय वरदान



नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः करोना महामारीच्या काळात आधुनिक वैद्यकशास्त्राच्या जोडीलाच होमिओपॅथीक उपचार पध्दतीही तितकीच प्रभावी असल्याचा अनुभव अनेक रूग्णांना येत आहे. अनेक आजारांवर अतिशय गुणकारी व रामबाण ठरणारी ही उपचार पध्दती जगमान्य झालेली असून भारतातही तिचा वेगाने प्रसार झालेला आहे. निसर्गनियमांवर आधारित असलेल्या शास्त्र म्हणून होमिओपॅथिक उपचार पध्दतीची शोध लावण्याचे काम करणारे डॉ.सॅम्युअल हॅनिमन यांचा जन्मदिन (10 एप्रिल) होमिओपॅथी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या प्रभावी उपचार पध्दतीचा अतिशय खुबीने वापर करून हजारो रूग्णांना त्याचा लाभ मिळवून देणारे नगरमधील डॉ.सचिन बोरा व डॉ.प्रतिमा बोरा हे दाम्पत्य होमिओपॅथी दूत म्हणून 17 वर्षापासून रूग्णांना दिलासा देण्याचे काम करीत आहेत. आताच्या महामारीतही रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे खास होमिओपॅथीक औषधे तसेच संसर्गबाधितांनाही आराम देणारी औषधे ते उपलब्ध करून देत आहेत.
जागतिक होमिओपॅथिक दिनानिमित्त संवाद साधताना डॉ.बोरा यांनी सांगितले की,  सर्व आजारांवर होमिओपॅथी प्रभावी आहे. 17 वर्षा पासून होमिओपॅथी प्रॅक्टिस करताना हजारो रूग्णांना व्याधीमुक्त, वेदनामुक्त केले आहे. ही उपचार पध्दती जुनाट रोगवर काम करते तसेच ऍक्यूट आजारामध्येही प्रभावी ठरते. सर्दी, खोकला, ताप, थंडी, तसेच मलेरीया, कावीळ, डेंग्यू मध्येही होमिओपॅथी प्रभावी आहे. डॉ.बोरा होमिओपॅथी क्लिनिकने स्वतंत्र कॅन्सर उपचार सेंटरही सुरु केलेले असून सर्व प्रकारच्या कॅन्सरवर विनाशस्त्रक्रिया, विना रेडिएशन अतिशय प्रभावी उपचार केले जातात. कॅन्सर रूग्णांसाठी स्वतंत्र शिबिरे घेवून त्यांना या दुर्धर आजारात आराम मिळवून दिला आहे. याशिवाय संधीवात, त्वचा रोग, केसांच्या समस्या, किडनीच्या समस्या, मुळव्याध, अर्धांंवायू ईत्यादी आजारावरही प्रभावी होमिओपॅथी उपचार केले जातात. तसेच मतीमंद, गतीमंद, प्रोस्टेट, हर्नीयावर सुध्दा उपचार उपलब्ध आहेत. करोना काळात रोगप्रतिकारशक्तीचे महत्त्व सर्वांना कळले आहे. होमिओपॅथीतील आर्सेनिक अल्बम 30 हे औषध रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे असल्याचे समप्रमाण सिध्द झाले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात राज्य सरकारने ग्रामीण भागातील जनतेला सरसकट हे औषध दिले आहे. त्यामुळे होमिओपॅथीच्या प्रभावाची प्रचिती निश्चितच समाजाला आली आहे. डॉ.प्रतिमा बोरा यांनी सांगितले की, महिलांच्या आरोग्यासंदर्भातही होमिओपॅथीमध्ये अतिशय चांगले उपचार उपलब्ध आहेत. आमच्या क्लिनिकमध्ये महिला समस्यांसाठी प्रत्येक सोमवार महिला क्लिनिक सुरू केले आहे. यात मासिक पाळीच्या समस्या, गर्भाशयाच्या गाठी, पीसीओएस/पीसीओडी, थायरॉईड, मूत्रमार्गात संक्रमण (यूटीआय), रजोनिवृत्ती, हार्मोनल असंतुलन, महिला लैंगिक समस्या, लठ्ठपणा, केसांची समस्या, त्वचेची समस्या, हाडांच्या समस्या इत्यादी समस्यांवर येथे उपचार केल्या जातात.
होमिओपॅथी हे निसर्गनियमांवर आधारित शास्त्र म्हणजेच एक वैद्यकीय शाखा आहे. हे शास्त्र सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर म्हणजेच समः समं शमयति (काट्याने काटा काढणे) या नियमावर आधारित आहे. होमिओपॅथीमधील औषधे असा आजार बरा करतात की, जी औषधे निरोगी मनुष्यास सौम्यमात्रेत दिली असता, ती त्या आजाराचा ठराविक लक्षणसमूह त्याच्यात निर्माण करतात. होमिओपॅथी ही समचिकित्सेच्या नियमावर आधारित औषधप्रणाली आहे. या उपचारपद्धतीचा शोध हॅनिमन या वैज्ञानिकाने लावला, म्हणून तिला हानेमानिझम असेही म्हणतात. डॉ.हॅनिमान यांनी अनेक औषधे स्वतः व दुसर्यांना पारखण्यासाठी देऊन (सिद्धीकरण करून) लक्षणसमूहाचा अभ्यास केला व त्या पद्धतीचे आजार बरे केले. हा प्रयोग त्यांनी तब्बल वीस वर्षे केला व प्रत्येकवेळी मिश्र औषधे न वापरता एकच औषध घेऊन केला (उदा., गंधक, सोने, तांबे, सिलिका इ.) व विविध आजारांवर उपचार शोधून औषधे निश्चित केली. होमिओपॅथीमध्ये आजार लवकरात लवकर बरा होतो, ही उपचारपद्धती हळुवार आहे तसेच आजार मुळापासून बरा होतो. हे दुष्परिणामविरहित वैद्यकीय शास्त्र असून विनाशस्त्रक्रिया उपचार होत असल्याने रूग्णाची मानसिक स्थितीही सकारात्मक होण्यास मदत होते. अनेक फायदे असलेल्या होमिओपॅथी उपचार पध्दतीचा जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ.बोरा यांनी यानिमित्त केले आहे.

No comments:

Post a Comment