मच्छीद्रनांथाचा समाधी सोहळा सलग दुसर्‍या वर्षीही रद्द..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 9, 2021

मच्छीद्रनांथाचा समाधी सोहळा सलग दुसर्‍या वर्षीही रद्द..!

 मच्छीद्रनांथाचा समाधी सोहळा सलग दुसर्‍या वर्षीही रद्द..!

आष्टी : करोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर मायंबा येथील मच्छीद्रनाथांचा 9 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान होणारा समाधी उत्सव सलग दुसर्‍यांदा रद्द करण्यात आला आहे. प्रथा परंपरा पाळत देवस्थान समितीकडून अत्यावश्यक विधी होतील. देवस्थांन समीती, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थच्या संयुक्त बैठक संपन्न झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहीती देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे व सचीव बाबासाहेब म्हस्के यांनी दिली.
कोरोनाचा फटका सर्वच यात्रा उत्सवांना बसत असून लाखोची उलाढाल ठप्प झाली आहे. मच्छीद्रनाथ गडावर पाडव्याच्या आदल्या दिवशीच्या यात्रेला अनन्यसाधारण महत्व असते राज्याच्या विविध भागातुन  विशेषतः ठाणे, पुणे कल्याण, पनवेल, नाशिक, औरंगाबाद, बीड यासह राज्याच्या विविध भागातून सुमारे दोन लाख भाविक मांयबा गडावर येतात .ओल्या कपड्याने  समाधी पूजा होते. मायंबा येथे दर्शन रांगेतील प्रत्येक भावीकाला समाधीला थेट स्पर्श करण्याची संधी या दिवशी उपलब्ध होते त्यामुळे दिवसेन दिवस मच्छीद्रनाथांच्या समाधी सोहळ्यासाठी भावीकांची गर्दी लाखोंच्या संख्येने जमते. सुगंधी उटणे लेपन विधीसाठी आललेे भावीक हाफ चड्डी किंवा अंडर पॅटवर दर्शन रांगेत असतात. समाधीस स्पर्श करण्यासाठी ओल्या कपड्यांसह मंदीरात प्रेवश करून संजवन समाधीला लेप लावल्यानंतर भवीकांना मिळणारा आत्मसुखाचा आनंद अवर्णनिय असतो. मात्र  कोरोना माहामारीमुळे सलग दुसर्‍यांदा हा सोहळा रद्द झाल्याने  या वर्षीदेखील भाविक समाधी सोहळ्या पासुन वंचीत राहणार आहेत. शासन निर्णयानुसार कमीत कमी पदाधीकारी, पुजारी, ग्रामस्थ पुजा करतील. गावातील भाविक कावडी आणून समाधी पूजन करतील. अन्य भाविकांना प्रवेश मिळणार नाही.

No comments:

Post a Comment