जिल्हा सहकारी बँकेच्या कर्मचारी संचालकपदी पवार व राजेभोसले यांची नियुक्ती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 10, 2021

जिल्हा सहकारी बँकेच्या कर्मचारी संचालकपदी पवार व राजेभोसले यांची नियुक्ती

जिल्हा सहकारी बँकेच्या कर्मचारी संचालकपदी पवार व राजेभोसले यांची नियुक्ती 


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर डिस्ट्रिक्ट को ऑपरेटिव्ह बँक्स एम्प्लॉईज युनियन तर्फे अशोक बबनराव पवार व सतीश मल्हारराव राजेभोसले यांची अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. युनियनचे कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी पवार व राजेभोसले यांच्या नियुक्तीचे पत्र नुकतेच बँकेस दिले आहे.
नुकतीच जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणुक होऊन नव्याने पाच वर्षांकरीता संचालक मंडळ असतित्वात आल्यानंतर कर्मचार्या मधून पवार व राजेभोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पवार हे जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात तर राजेभोसले शेवगाव तालुक्यातील राक्षी शाखेत कार्यरत आहेत. कर्मचारी संचालक नेमणुकीबाबत कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. युनियनचे कार्याध्यक्ष धनंजय भंडारे, सहसचिव नितीन भंडारी, मधुकर पटारे, खजिनदार एम.वाय. कुलकर्णी यांनी नुतन कर्मचारी संचालकांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment