कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुंडेगाव उत्स्फूर्तपणे 7 दिवस बंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, April 10, 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुंडेगाव उत्स्फूर्तपणे 7 दिवस बंद

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुंडेगाव उत्स्फूर्तपणे 7 दिवस बंद


नगरी दवंडी/प्रतिनिधी
गुंडेगाव ः कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मा.जिल्हा परिषद बाळासाहेब हराळ यांच्या मार्गदर्शनाखाली  गुंडेगाव  ग्रामपंचायत व ग्राम सुरक्षा समिती याच्या संयुक्त निर्णयाने गुंडेगाव येथे सात दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन करण्यात येणार आसून कोरोना ची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय ग्राम सुरक्षा बैठकीत संरपच मंगल सकट, उपसंरपच संतोष भापकर यांच्या अध्यक्षतेखाली  घेण्यात आला आहे तसेच यावेळी सर्व व्यावसायिकांचे मत जाणून घेण्यात आले सर्वानुमते लॉकडाऊन चा निर्णय घेण्यात आला आहे ,गावातील दुध व्यावसायिकांना सकाळी दोन तास सुट देण्यात आली आसून गावातील दवाखाने व मेडिकल 24 तास चालू राहणार आहेत या उपाययोजना साठी डॉ.रमेश  कासार, डॉ. प्रशांत कुताळ, डॉ.गजानन भापकर यांनी मार्गदर्शन केले आसून आम्ही वैद्यकीय सेवा देण्यासाठी कटीबध्द आहोत यावेळी सांगण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य  संतोष धावडे, सुनील भापकर, संदिप जाधव,  सतिश चौधरी, भाऊसाहेब हराळ, राहुल चौधरी, रमेश चौधरी,  संतोष सकट, डॉ. विलास सकट,  संतोष हातवळणे, गणेश हराळ दुकानदार,संतोष कोतकर, सुनील पवार, शहाजी कुताळ,  भवानी प्रसाद चुंबळकर मेजर, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे, संभाजी जाधव,  राजेंद्र राऊत, नाना सोनवणे,गणेश दिवटे, विकास भापकर,  संदिप भापकर, रामकृष्ण कुताळ,सचिन जाधव , विकास हराळ,  गोकुळ पवार,  शैलैज पिंपरकर,खंडू भिसे, प्रदिप भापकर, शिवनाथ कोतकर,  पत्रकार संजय भापकर  व अनेक व्यावसायिक प्रतिनिधी व ग्राम सुरक्षा समितीचे सदस्य उपस्थितीत होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here