वीज चोरी करणार्‍यावर कारवाई न केल्याने सहाय्यक अभियंता सत्येंद्र सिंग यांनाच अकरा हजाराचा दंड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 10, 2021

वीज चोरी करणार्‍यावर कारवाई न केल्याने सहाय्यक अभियंता सत्येंद्र सिंग यांनाच अकरा हजाराचा दंड

 वीज चोरी करणार्‍यावर कारवाई न केल्याने सहाय्यक अभियंता सत्येंद्र सिंग यांनाच अकरा हजाराचा दंड

नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः वीज चोरी प्रकरणात कायदेशीर कारवाई न करणार्‍या सहाय्यक अभियंता सत्येंद्र सिंग यांच्यावर महावितरणने अकरा हजार रुपयाचा दंड करून हा दंड त्यांच्या वेतनातून वसूल करण्याचा आदेश दिला आहे.
कर्जत उपविभागातील कर्जत एक शाखेचे माहे एप्रिल 2019 ते मार्च 2020 या कालावधीमध्ये तालुक्यात वीज चोरी करणार्‍या 65 विजचोरीच्या  प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई करून दि 15 जून 2020 पर्यत अहवाल सादर  करण्याच्या सूचना उपकार्यकारी अभियंता कर्जत यांनी दिलेल्या असताना कर्जत येथील सहाय्यक अभियंता सत्येंद्र  अनंतप्रताप सिंग यांनी याबाबत हा अहवाल सादर केला नाही, व संबंधित वीज चोरावर कारवाई न केल्यामुळे सिंग यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. त्यावर सिंग यांनी आपला खुलासा ही दिला मात्र त्यांनी दिलेल्या खुलासा समाधानकारक नसल्याचे कारण देत महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी याप्रकरणात त्यांना दंड ठोठवत वेतनातून अकरा हजार रुपये रकमेचा दंड कपात करण्याचा आदेश काढला असून सदर दंडाची रक्कम माहे 2021 च्या वेतनातून कपात करण्यात या असाही आदेश दिला आहे.
दिनांक 3 मार्च रोजी काढलेल्या या आदेशाने यांच्या पगारातून हा दंड वसूल करण्यात आला असून यामुळे वीज वितरण यांच्या कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ माजली आहे. याबाबत सहाय्यक अभियंता सत्येंद्र अनंतप्रताप सिंग यांना विचारले असता सर्वसामान्य लोकांचा विचार केल्याची शिक्षा आपल्याला देण्यात आली असून लोकांनी वीज चोरी करू नये आपली बिले त्वरित भरावीत व शासनाच्या वीज कंपनीस सहकार्य करावे असे आवाहन सिंग यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment