हॉटेल यशराज परमिट रुम व रेस्टॉरंटच्या वतीने कोरोनाबाधीत रुग्ण व नातेवाईकांना थेट हॉस्पिटलमध्ये मोफत जेवनाचा डबा ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, April 25, 2021

हॉटेल यशराज परमिट रुम व रेस्टॉरंटच्या वतीने कोरोनाबाधीत रुग्ण व नातेवाईकांना थेट हॉस्पिटलमध्ये मोफत जेवनाचा डबा !

 हॉटेल यशराज परमिट रुम व रेस्टॉरंटच्या वतीने कोरोनाबाधीत रुग्ण व नातेवाईकांना थेट हॉस्पिटलमध्ये मोफत जेवनाचा डबा !



नगरी दवंडी

नेवासा - शेवगांव राज्य मार्गावर असलेल्या कुकाणा येथील हॉटेल यशराज रेस्टॉरंट,परमिट रुम अॅण्ड बिअरबारचे संचालक व सामाजिक कार्यकर्त राहूल जावळे यांनी कुकाणा व परिसरातील कोरोनाबाधीत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना थेट हॉस्पिटलात जावून मोफत जेवनाचा डबा देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे.या उपक्रमाचे जनतेतून स्वागत होत असतांना इतरही व्यावसायिकांनी जावळे यांचा आदर्श घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

   हॉटेल यशराज'चे मालक राहूल जावळे यांचे कुकाणा येथे रेस्टॉरंट,परमिट रुम,बियरबार व लॉजिंग हा व्यावसाय आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने येथे काम करत असलेल्या कामगारांनीही बसून पगार द्यावा लागत आहे तर दुसरीकडे कडक लॉकडाऊन असल्यामुळे कोरोनाबाधीत रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना जेवनासाठी तरसावे लागत असतांना जावळे यांनी आपणही समाजाचे देणे लागतो या हेत्तूने त्यांनी आपल्या हॉटेलात बसून पगार घेणाऱ्या नोकरांनाही काम देवून कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधीत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना थेट हॉस्पिटल जावून जेवनाचा डबा पोहच करण्याचे काम जावळे यांनी केले आहे.या उपक्रमाचे स्वागत माजी आमदार पांडुरंग अभंग,राज्याचे मृद व जलसंधारणमंञी शंकरराव गडाख यांनी केले आहे राहूल जावळे यांनी सुरु केलेल्या हॉटेलातून थेट रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना जेवनाचा डब्बा पुरविण्याच्या स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment