विकासकामांतून नागरिकांचा विश्वास संपादन करता येतो ः गंधे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, April 5, 2021

विकासकामांतून नागरिकांचा विश्वास संपादन करता येतो ः गंधे

 विकासकामांतून नागरिकांचा विश्वास संपादन करता येतो ः गंधे

पाणी प्रश्न मार्गी लावल्याबद्दल नगरसेवक महेद्रभैय्या गंधे यांचा नागरी सत्कार संपन्न

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः केंद्र सरकारकडून शहर विकासाच्या प्रश्नासाठी निधी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजप नेहमीच कटीबध्द भाजपा नेहमीच कटीबध्द आहे. विकास कामातून नागरिकांचा विश्वास संपादन करता येत असतो. सर्वांना बरोबर घेवून काम केल्यामुळे एकमेकांमध्ये आपुलकी निर्माण होते. प्रभागातील विकासाचे कामे मार्गी लावून प्रभाग हा समस्यामुक्त करणार आहे. विकास कामामध्ये मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे व प्रभागातील नगरसेवकांचे सहकार्य लाभत आहे. प्रोफेसर कॉलनी परिसरातील चैतन्य अपार्टमेंट अलोक अपार्टमेंट आरती अपार्टमेंट मधील नागरिकांना गेल्या 10 वषापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तांत्रिक अडचणीमुळे या भागातील नागरिकांना मनपाच्या माध्यमातून पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होत नव्हता तो मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून या भागातील पाणी प्रश्न मार्गी लावला असल्याचे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक मा.श्री.महेंद्रभैय्या गंधे यांनी केले.
    प्रभाग क्र. 5 मधील प्रोफेसर चौक परिसरातील चैतन्य अपार्टमेंट ,अलोक अपार्टमेंट, आरती अपार्टमेंट मधील नागरिकांचा पाणी प्रश्न भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक मा.श्री.महेंद्रभैय्या गंधे यांनी मार्गी लावल्याबद्दल रहिवाशांच्या वतीने त्यांचा सत्कार करताना श्री.चंद्रकांत गुरसाळ, श्री.गोविंद् कुलकर्णी, श्री.अवधूत कुक्कडवाल, श्री.मंदार भोंग, श्री.श्रीपाद भोंग, श्री.पराग दिक्षीत, श्री.चैतन्य जोशी, श्री.विजय लोढे, श्री.प्रताप जगदाळे, श्री.रजनी जोशी, श्री.शुभांगी दिक्षीत श्रीमती शालीनी भोंग, श्रीमती निलीमा लोंढे,  आदी नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here