मागील भांडणाच्या कारणावरून काष्टी येथे महिलांना बेदम मारहाण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 5, 2021

मागील भांडणाच्या कारणावरून काष्टी येथे महिलांना बेदम मारहाण

 मागील भांडणाच्या कारणावरून काष्टी येथे महिलांना बेदम मारहाण

श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे मागील भांडणाच्या कारणावरून सतिष मोहन शिंदे, आतेश मोहन शिंदे, राहुल मोहन शिंदे, विलास भिमा गायकवाड सर्व रा.काष्टी यांनी घरात घुसून पोलिस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा मागे घे असे म्हणत लाथा बुक्याने मारहाण करुन शिवीगाळ केल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुरुवार दि.1 एप्रिल रोजी जया संतोष गुंजाळ वय 30 यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
   या बाबत सविस्तर असे की काष्टी येथील संतोष सिताराम गुंजाळ यांना व त्यांच्या कुटुंबीयांना तीन महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण करुन मारहाण केले प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात सतिष मोहन शिंदे, आतेश मोहन शिंदे, राहुल मोहन शिंदे, विलास भिमा गायकवाड सर्व रा.काष्टी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता याचा राग येऊन गुरुवार दि.1 एप्रिल रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सतिष मोहन शिंदे, आतेश मोहन शिंदे, राहुल मोहन शिंदे, विलास भिमा गायकवाड सर्व रा.काष्टी यांनी गुंजाळ यांच्या घरात घुसून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा माघारी का घेत नाही असे म्हणुत गुंजाळ यांची पत्नी जया संतोष गुंजाळ वय 30 यांना लाथा बुक्याने मारहाण करत शिवीगाळ केली यावेळी जया यांची सासु सुंदराबाई सुनेला सोडविण्यासाठी गेल्या असता त्यांना देखील शिवीगाळ करुन खाली पाडुन लाथा बुक्यान मारहाण करत घराचे बाहेर जावुन घरावर दगड फेक करत केस मागे घेतली नाही तर तुमचे कडे पाहुन घेतो अशी धमकी देऊन निघुन गेले या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात जया संतोष गुंजाळ वय 30 यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

No comments:

Post a Comment