आरपीआयच्या नगर तालुका अध्यक्षपदी अविनाश भोसले यांची नियुक्ती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, April 5, 2021

आरपीआयच्या नगर तालुका अध्यक्षपदी अविनाश भोसले यांची नियुक्ती

 आरपीआयच्या नगर तालुका अध्यक्षपदी अविनाश भोसले यांची नियुक्ती


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाच्या नगर तालुका अध्यक्षपदी अविनाश अभिमन्यू भोसले यांची निवड करण्यात आली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांच्या आदेशावरुन संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
   शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकित जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी भोसले यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, युवक जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, बौद्धाचार्य संजय कांबळे, युवक शहराध्यक्ष अमित काळे, पारनेर युवक तालुकाध्यक्ष राजू उबाळे, युवक जिल्हा उपाध्यक्ष दीपक गायकवाड, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, श्रीपाद वाघमारे, अमोल भंडारे, भैय्या पठाण, अनिकेत पाटोळे, शुभम वैराळ, प्रसन्न बिडकर, प्रदीप देठे, महेश गाडे, गणेश आटोळे, सचिन शिरसाठ, सचिन देठे, शंकर विघावे, मतीन शेख, आफताब बागवान, अरबाज बागवान, दिपक ससाणे, जुबेर शेख, निलेश कांबळे, गणेश ढाने, सूरज निकाळजे, सतीश साळवे आदी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे म्हणाले की, सर्व समाजाला बरोबर घेऊन फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचाराने आरपीआय पक्ष जिल्ह्यात कार्यरत आहे. वंचित, मागासवर्गीय, दीन, दुबळ्यांना आरपीआयच्या माध्यमातून आधार देण्यात येत आहे. जिल्ह्यात युवा कार्यकर्ते पक्षाशी जोडले जात असून, अविनाश भोसले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची नगर तालुकाध्यक्षपदी  नियुक्ती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना अविनाश भोसले म्हणाले की, समाजातील शेवटच्या घटकांना प्रवाहात आनण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून कटिबध्द राहणार आहे. नगर तालुक्यातील विविध प्रश्न पक्षाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहून गाव तेथे शाखा स्थापन करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. या निवडीबद्दल भोसले यांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले व आरपीआयचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांनी दूरध्वनी वरून त्यांना शुभेच्छा दिल्या. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here