दहावी/ बारावी परीक्षांच्या पेपरची वेळ बदला ः गाडगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, April 5, 2021

दहावी/ बारावी परीक्षांच्या पेपरची वेळ बदला ः गाडगे

 दहावी/ बारावी परीक्षांच्या पेपरची वेळ बदला ः गाडगे

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील बारावी व दहावीच्या परीक्षा अनुक्रमे 23 एप्रिल व 29 एप्रिल पासून सुरू होणार आहेत. दरवर्षी फेब्रुवारी- मार्चमध्ये होणार्‍या या परीक्षा यावर्षी एप्रिल-मे महिन्यात होत आहेत. राज्यभर एप्रिल-मे महिन्यात कडक उन्हाळा असतो. राज्यातील अनेक ठिकाणचे तापमान 40 अंश पेक्षा जास्त असते. प्रचंड उकाड्यात पेपर लिहिताना शारीरिक त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या  गुणांवर होऊ शकतो. अशा परिस्थितीत सकाळी लवकर परीक्षा घेणे आवश्यक आहे. त्यामुळे बारावी / दहावीच्या परीक्षांच्या पेपरची वेळ बदलणेबाबत शिक्षक भारती संघटनेने  शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना पत्र दिल्याची माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे   राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी दिली.  
    कडक उन्हाळा आणि राज्यातील अनेक भागातील वाढत्या तापमानाची परिस्थिती लक्षात घेऊन बारावी व दहावीच्या शालांत परीक्षा सकाळी लवकर म्हणजे सकाळी 8 वाजता सुरू करण्याबाबत नियोजन करण्याची विनंती या पत्राद्वारे शिक्षणमंत्र्यांना करण्यात आली आहे अशी माहिती शिक्षक नेते सुनील गाडगे,जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, उर्दू विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहमंद समी शेख. योगेश हराळे.उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु ,जिल्हा माध्यमिकचे  सचिव विजय कराळे , कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे,उच्च माध्यमिक चे जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे. संभाजी पवार,हनुमंत  रायकर ,सुदाम दिघे, नवनाथ घोरपडे. गोरखनाथ गव्हाणे. संतोष देशमुख . किसन सोनवणे.संजय तमनर . संभाजी चौधरी. कैलास जाधव.  सोपानराव कळमकर. संजय भूसारी.शंकर भिवसने श्रीकांत गाडगे. विलास गाडगे . महिला जिल्हाध्यक्ष आशा   मगर. महिला सचिव विभावरी रोकडे . कार्याध्यक्ष मिनाक्षी सूर्यवंशी. रोहिणी भोर शकुंतला वाळुंज, छाया लष्करे. जया गागरे. अमृता गायखे. संध्या गावडे. अनघा सासवडकर, रेवन घंगाळे .जॉन सोनवणे आदींनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here