पाणीवापर संस्थेच्या गलथानपणामुळे सिंचन क्षेत्रास कोलदांडा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, April 5, 2021

पाणीवापर संस्थेच्या गलथानपणामुळे सिंचन क्षेत्रास कोलदांडा

 पाणीवापर संस्थेच्या गलथानपणामुळे सिंचन क्षेत्रास कोलदांडा

वरिष्ठांकडून दप्तर पाहणी करून कारवाई करण्याची चर्चा
नगरी दवंडी/प्रतिनिधी
माका ः राज्यात जलव्यवस्थापन अधिनियम 2005नुसार जलक्षेत्र सुधारणा प्रकल्प अंतर्गत पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आल्या. पाटबंधारे विभागा कडुन निवडणूक प्रक्रियेनुसार संस्थेस चेअरमन,सदस्य कमीटी यापद्धतीने पाणी वापरासंदर्भात अधिकार दिले गेले.परंतु संस्था चेअरमन सदस्यांना विचारात न घेता,मनमानी कारभारातुन बेहिशोबी लाखो रु.ची अफरातफर करत असल्याबाबत तसेच आवश्यक सिंचन क्षेत्रास कालव्याचे योग्य पद्धतीने पाणी मिळत नसल्याचे संस्था सदस्यच तसेच शेतकरी वर्गातुन बोलले जात आहे.                                                                            
   याबाबत असे की,या अगोदर पाटबंधारे विभाग अंतर्गत विभागीय कार्यालयाच्या अधिकारी वर्गाच्या सहाय्याने, कालव्याचे पाणी सिंचन क्षेत्रासाठी शेतकरी वर्गास दिले जात असे.परंतु 2005 नुसार जलक्षेत्र सुधारणा प्रकल्प अंतर्गत पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून सिंचन क्षेत्रास पाणी देण्यास सुरुवात झाली. यानंतर,संस्था चेअरमन नियुक्ती कार्यकाल रोटेशन पद्धतीने दोन वर्षे,कमीटी सहा वर्षे लोकशाही निवडणूक प्रक्रियेनुसार यांच्या नियुक्तया करण्यात आल्या.या निर्णयामुळे संस्थेवरती पाटबंधारे विभागाचा अंकुश राहिला नसल्याने मनमानी कारभार सुरु होवुन,पाटबंधारे विभागाचे संस्थेकडे लाखो रुपये थकीत असल्याचे संबधित कार्यालयातुन समजते.                                                        
    याबाबत अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील मुळा पाटबंधारे उपविभागीय कार्यालयीन शाखा माका अंतर्गत माका, पाचुंदे, निंबेनांदुर म. ल.हिवरे, आडगाव,कामत शिगवे,जवखेडे,या भागात पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून शेतीसाठी पाण्याची उपाययोजना केली जाते.माका परिसरातील पाणीचारयांच्या दुरावस्थेमुळे, संस्था चालकाच्या बेहिशोबी, गलथान मनमानी कारभाराने,संबधित विभागाचे लाखो रुपये थकीत असल्यामुळे  शेतकरी वर्गास शेतीपिकासाठी क्षेत्रास फारसे पाणी मिळत नाही.याउलट शेतकरयांना हक्काच्या चारी माध्यमातून पिकास पाणी न देता दुसरीकडेच ओढ्याने पाण्याची विक्री संस्था चालका मार्फत केली जात असल्याचेही बोलले जाते.                                 यासंदर्भात कालव्यातून पाणी चारीने सिंचन क्षेत्रास घेण्यासाठी संस्थेस संबधित पाटबंधारे  विभागाकडुन चारीदुरुस्तीसाठी थकीत रक्कम भरलेल्या टक्केवारीत अनुदानही दिले जात असुन, त्याचा वापर संस्थाचालकांकडुन चारीदुरुस्तीसाठी खर्च होत नसल्याचे सांगितले जात आहे.यामुळे चारयांची अतिशय बिकट अवस्था झाली असल्याने शेतकरी वर्गास शेतीसाठी फारसा फायदा होत नसल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात माका परिसरातील भगवान बाबा पाणी वापर, मंकावती पाणी वापर,वामनभाऊ पाणी वापर संस्थां बाबतीत वरिष्ठांनी लक्ष देवून,संस्थेच्या ऑफिस दप्तरची पहाणी,चौकशी करून, शेतीसंबंधी पाटपाण्याच्या गंभीर  प्रश्ना बाबतीत दोषी संस्था तसेच पदाधिकारयांवरती कारवाई करावी.असे सध्यातरी शेतकरी वर्गातुन बोलले जात आहे.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here