गितेवाडी शाळेने राबविला लेखिका विद्यार्थ्यांच्या भेटीला उपक्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, April 5, 2021

गितेवाडी शाळेने राबविला लेखिका विद्यार्थ्यांच्या भेटीला उपक्रम

 गितेवाडी शाळेने राबविला लेखिका विद्यार्थ्यांच्या भेटीला उपक्रम


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने 22 मार्च 2021 रोजी पाठ्यपुस्तकातील लेखिका विद्यार्थ्यांच्या भेटीला हा नवोपक्रम राबविला.
    पाठ्यपुस्तकातील  लेखिका अंजली अत्रे यांनी गुगल मिट अँपद्वारे विद्यार्थ्यांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधून विविध विषयांवर  चर्चा  केली .कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शाळांना 17 मार्च 2020 पासून सुट्ट्या दिल्या आहेत.शाळा बंद असल्या तरी गितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण  शिक्षकांनी उत्कृष्ट पणे चालू ठेवले आहे.या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम कोरोना बाबत  योग्य ती दक्षता घेऊन  ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने राबविले जातात असे शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ व नवनाथ आंधळे यांनी सांगितले .इयता चौथीच्या मराठी विषयाच्या पाठयपुस्तकातील  मिठाचा शोध या धड्याच्या लेखिका तसेच अभिनेत्री ,कथाकार  अंजली अत्रे यांनी विद्यार्थ्यांशी  व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे  सुमारे दीड तासआनंदाने  संवाद  साधून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची  सवित्तर उत्तरे दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांचे ऑनलाईन स्वागत केले .पुढीलप्रमाणे विविध प्रश्न विचारून संवाद साधला .लेखिकेचे बालपण ,शिक्षण  ते लेखिका हा प्रवास कसा झाला ?मिठाचा शोध हा धडा इयता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी का लिहिला?या धड्यातून तुम्ही विद्यार्थ्यांना कोणता संदेश द्याल ?
   लेखक होण्यासाठी आपण काय केले पाहिजे ? लेखिका होण्यासाठी  आपणास कोणी मार्गदर्शन केले ?यासाठी कोणी प्रेरणा दिली ?आपण आणखी कोणकोणती पुस्तके लिहिली आहेत ? भविष्यात यशस्वी होण्यासाठी  विद्यार्थ्यांनी काय केले पाहिजे ?आपण शिक्षण घेतले ती शाळा कशी होती ?आम्ही आणखी कोणकोणते उपक्रम राबविले पाहिजेत ?आपण इतर वर्गातील विद्यार्थ्यांसाठी कोणते लेखन केले आहे ? आम्हाला काही गोष्टी सांगा   ,,,,,,अशा अनेक विषयांवर विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी आनंदाने संवाद साधून चर्चा केली.लेखिका अंजली अत्रे यांनी विद्यार्थ्यांना आनंदाने अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केले. ज्या गोष्टीचे लेखन अजून प्रसिद्ध झाले नाही ती महान गोष्ट विद्यार्थ्यांना सांगून त्यातून अनमोल संदेश दिला .आजचा संवाद विद्यार्थी त्यांच्या जीवनात कधीही विसरणार नाहीत असा आनंददायी झाला .या संवादात विद्यार्थ्यांबरोबर पालकही मोठ्या संख्येने सहभागी झाले. शाळेच्या अनेक  उपक्रमात पालकांना सहभागी केले जाते .त्यामुळे शाळेत कोणकोणते उपक्रम राबविले जातात असे सुमारे विविध विविध उपक्रम  पालकांनी लेखकांना सांगितले .शाळेत राबवित असलेल्या  विविध  उपक्रमांची पीपीटी  शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ यांनी दाखवून शाळेत विविध उपक्रम राबवून शाळेचे लोकसहभागातून केलेले परिवर्तन याबाबत माहिती दिली .शाळेतील विविध उपक्रम पाहून  लेखिका अंजली अत्रे यांना खूप आनंद झाला. शाळेतील उपाध्यापक नवनाथ आंधळे यांनी सर्वांचे आभार मानले. लेखिका अभिनेत्री अंजली अत्रे या पर्यावरणप्रेमी आहेत .त्यांच्या घराजवळ  केलेली विविध रोपांची लागवड त्यांनी विद्यार्थ्यांना दाखवून समजावून दिली.शाळेची प्रगती पाहून त्यांनी विद्यार्थ्यांचे ,शिक्षकांचे ,पालकांचे  अभिनंदन केले.एक दिवस आमच्या पर्यावरण पूरक शाळेला आवर्जून भेट देण्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here