श्रीगोंद्यात कुकडीच्या पाण्यासाठी आंदोलन करणार्‍या आंदोलकांना अटक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 16, 2021

श्रीगोंद्यात कुकडीच्या पाण्यासाठी आंदोलन करणार्‍या आंदोलकांना अटक

 श्रीगोंद्यात कुकडीच्या पाण्यासाठी आंदोलन करणार्‍या आंदोलकांना अटक


श्रीगोंदा -
कुकडीपाणी प्रश्नासाठी श्रीगोंदा शहरातील पेडगाव रस्त्यावरील कुकडी कार्यालयासमोर माजी जिल्हा परिषद सदस्य दिकर पंधरकर , प्रमोद जगताप , सुरेश भापकर, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते.कोरोना पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी , संचारबंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी या चौघांना श्रीगोंदा पोलिसांनी अटक करत आंदोलन केल्या प्रकरणी चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी सांगितले की डिंबे माणिकडोह जोड कालव्याचे काम लवकर सूरू करावे तसेच 10 मे रोजी सुटणारे कुकडीचे आवर्तन हे 25 एप्रिलला सोडावे या मागणीसाठी कुकडी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते हे आंदोलन करताना जमावबंदी आदेशाचे कोणतेही उल्लंघन केलेले नाही. मात्र शेतकर्‍यांचा आवाज दडपण्यासाठी आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली आहे. या आंदोलनास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, विदर्भातील शेतकरी संघटनेचे नेते विजयराव जावंधिया, प्रकाश पोहरे, सामाजिक कार्यकर्त्यां मेधाताई पाटकर, सेवानिवृत्त आयपीएस सुरेश खोपडे यांनी पाठिंबा दिला आहे. आंदोलकांवर केलेल्या कारवाईचा राज्यभर निषेध होणार असून आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या निवासस्थानी आंदोलन करणार आहोत
पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी सांगितले की जिल्हाधिकारी यांचे कोरोना पार्श्वभूमीवर संचारबंदी, जमावबंदीचे आदेश असल्याने आंदोलकांनी आंदोलन करून आदेशाचा भंग करु नये, यासाठी आंदोलकांना नोटीस दिली होती. पण त्यांनी ऐकले नाही म्हणून ना इलाजाने कारवाई करणे भाग पडले.

No comments:

Post a Comment