साधूसाध्वीजींचे चांगले आरोग्य समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे : अमित मुथा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 16, 2021

साधूसाध्वीजींचे चांगले आरोग्य समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे : अमित मुथा

 साधूसाध्वीजींचे चांगले आरोग्य समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे : अमित मुथा

जितो श्रमण आरोग्य योजनेंतर्गत नगर जिल्ह्यात साधूसाध्वीजींची नोंदणी सुरु


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जैन धर्मिय साधूसाध्वीजी धर्म प्रभावनेसाठी देशभर विहार करीत असतात. त्यांचे शारीरीक आरोग्य चांगले असणे, ते स्वास्थ्यपूर्ण असणे समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. हीच बाब लक्षात घेवून जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनने (जितो) देशपातळीवर सर्वपंथीय जैन साधूसाध्वीजींसाठी श्रमण आरोग्य योजना सुरु केलेली आहे. याअंतर्गत सर्व साधूसाध्वीजींची नोंदणी करून त्यांचे हेल्थ कार्ड तयार केले जाते. विहार करताना कुठेही ते आजारी पडल्यास त्यांना स्थानिक संघपतींच्या माध्यमातून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले जाते व हॉस्पिटलमधील सर्व उपचार खर्च जितोतर्फे थेट हॉस्पिटलला दिला जातो. या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त पूजनीय साधूसाध्वीजींना मिळवून देण्यासाठी जितो अहमदनगरने नगरसह जिल्ह्यात नोंदणी कार्यक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती जितो अहमदगनरचे अध्यक्ष अमित मुथा यांनी दिली.
या उपक्रमांअतर्गत नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या तब्बल 37 साधूसाध्वीजींची नोंदणी करण्यात आली आहे. युवाचार्य पूज्य महेंद्रऋषीजी म.सा., महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी म.सा., प्रबुध्द विचारक पूज्य आदर्शऋषीजी म.सा., पूज्य आलोकऋषीजी, महासतीजी पूज्य अर्चनाजी म.सा., पूज्य उदयाप्रभाजी म.सा., पूज्य पुष्पकंवरजी म.सा., पूज्य विपुलदर्शनाजी म.सा. पूज्य सुनंदाजी म.सा. यांच्या आशिर्वादाने नगरमध्ये नोंदणी प्रक्रिया करण्यात आली. यावेळी जितो अहमदनगरचे चेअरमन अमित मुथा, सेके्रटरी प्रितेश दुगड, श्रमण आरोग्यम योजनेच्या समन्वयक सिमा मुनोत, जितो लेडीज विंगच्या चेअरमन मेघना मुनोत आदी उपस्थित होते. मेघना मुनोत म्हणाल्या की, पूजनीय साधूसाध्वीजी हे समाजाचे वैभव आहेत. समाजाला दिशा देण्याचे काम ते सर्व संसारसुखांचा त्याग करून करीत असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे कर्तव्य समजून जितोतर्फे देशभरात साधूसाध्वीजींना हेल्थकार्ड देवून त्यांच्या उपचारांचा खर्च केला जातो.

No comments:

Post a Comment