राहुरीत बालाजी मंगल कार्यालयात कोविड केअर सेंटरची उभारणी पूर्ण ः ना. तनपुरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, April 16, 2021

राहुरीत बालाजी मंगल कार्यालयात कोविड केअर सेंटरची उभारणी पूर्ण ः ना. तनपुरे

 राहुरीत बालाजी मंगल कार्यालयात कोविड केअर सेंटरची उभारणी पूर्ण ः ना. तनपुरे


राहुरी-
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मतदारसंघात रुग्णांच्या सेवेकरीता अधिक बेड्स उपलब्ध व्हावेत यासाठी राहूरीतील बालाजी मंगल कार्यालय येथे राहुरी डेडिकेटेड कोविड केअर सेंटर ची उभारणी पूर्ण झाल्याची माहिती राज्यमंत्री ना प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
तसेच श्री. सतीश तनपुरे यांच्या पुढाकाराने शुभ कीर्ती मंगल कार्यालय येथे कोव्हिड केअर सेंटरची उभारणी केली आहे. गुरुवारी दि 15 रोजी शुभ कीर्ती मंगल कार्यालयातील केअर सेंटरचा शुभारंभ करण्यात आला. बालाजी मंगल कार्यालय येथे एकूण 70 बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी 20 बेड्स हे ऑक्सिजन युक्त आहेत.
ना तनपुरे यांनी बालाजी मंदिरातील सेंटरला बुधवारी भेट दिली यावेळी तहसीलदार एफ आर शेख, संतोष आघाव , नंदकुमार तनपुरे , पांडुरंग उदावंत उपस्थित होते. शुभ कीर्ती मंगल कार्यालय येथे 100 बेड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत . उत्तम आरोग्य व्यवस्था, तज्ञ डॉक्टर्स, जेवणाची सुविधा येथे उपलब्ध असणार आहे . त्याचप्रमाणे तिसगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत देखील मागील 25 व उद्यापर्यंत 25 अश्या सुमारे 50 बेड्स साठी आवश्यक ती सर्व सामुग्री पुरविण्यात आली आहे. आहे त्या रुग्णांना योग्य उपचार देणे आणि कोरोनाचा फैलाव थांबवणे हे आमचे प्रथम उद्दिष्ट आहे. नागरीकांनी देखील शासनाचे नियम पाळून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here