नाभिक समाजासह बारा बलुतेदारांना व्यवसाय सुरु करण्याची परवानगी मिळावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, April 13, 2021

नाभिक समाजासह बारा बलुतेदारांना व्यवसाय सुरु करण्याची परवानगी मिळावी

नाभिक समाजासह बारा बलुतेदारांना व्यवसाय सुरु करण्याची परवानगी मिळावी 


नगरी दवंडी/प्रतिनिधी

श्रीगोंदा ः महाराष्ट्र बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणरावजी दळे व महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष माऊली मामा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तहसील कार्यालय येथे श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदीप पवार साहेब यांना नाभिक समाजासह बारा बलुतेदारांना व्यवसाय सुरु करण्याची परवानगी मिळावी अथवा नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी श्रीगोंदा तालुका महाराष्ट्र नाभिक महामंडळ व बारा बलुतेदार महासंघातर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली.

राज्य सरकारने केलेल्या मिनी लॉकडाऊनमुळे नाभिक समाजाची आर्थिक स्थिती खराब झाली असून राज्य सरकारने त्यांना आर्थिक मदत द्यावी. त्याच बरोबर नाभिक समाज हा संपूर्ण व्यवसायावर अवलंबून आहे. समाजात लॉकडाऊन मुळे आत्महत्याचे प्रमाण वाढले असून त्याच्यातून सावरण्यासाठी शासनाने दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी. अशी मागणी श्रीगोंदा तालुका महाराष्ट्र नाभिक महामंडळ व बारा बलुतेदार महासंघातर्फे श्रीगोंदा तहसीलदार प्रदीप पवार यांना निवेदनाद्वारे केली. यावेळी सभापती पती शंकर पाडळे, पै.अजय रंधवे, कांतीलाल कोकाटे, विजय क्षिरसागर, इंद्रजीत कुटे, पै.बंटी रंधवे, भाऊसाहेब डांगे उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here