महावितरण कंपनीचा जामखेड तालुक्यात गलथान कारभार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 13, 2021

महावितरण कंपनीचा जामखेड तालुक्यात गलथान कारभार

 महावितरण कंपनीचा जामखेड तालुक्यात गलथान कारभार

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी दिला आंदोलनाचा इशारा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर चिंतेत असलेली जनता वीजेच्या लपंडावामुळे जास्तच वैतागलेली आहे.याचा फटका रूग्नालयातील उपचार घेत असलेल्या  रूग्नाना सर्वाधिक बसत आहे. याबाबत जामखेड शहरातील वीज पुरवठा नियमित ठेवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी दिला आहे.
सध्या कोरोना महामारीमुळे सिटीस्कॅन  करणे  गरजेचे आहे  सिटीस्कॅन करण्यासाठी रूग्नांना लाईट नसल्यामुळे पाच - पाच तास प्रतिक्षेत बसावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  त्यामध्ये  जामखेड तालुका,  आष्टी तालुका, पाटोदा तालुका साठी एकच सिटीस्कॅन मशिन जामखेडला आहे लाईट वेळेवर राहिली तर अडचण येणार नाही मात्र वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने रूग्नाना वेळ जावून नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. रक्ताच्या चाचण्या घेण्यासाठीही अडचण येत आहे .पाच - पाच ,सहा- सहा वीजपुरवठा सूरू होईपर्यंत रूग्नना रांगेत उभे राहण्याशिवाय पर्याय राहत नाही. यादरम्यान काही रूग्न गावभर फिरून येण्याचे प्रकार होत आहेत. यातून अन्य लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सध्या कुठल्याही वेळी वारंवार  वीजपुरवठा खंडीत होत आहे .त्यामुळे जनतेचे तसेच रूग्नांचे खुपच हाल होत आहेत. याप्रश्री महावितरणच्या संबंधित अधिकार्‍यांना फोन केला तर ते फोन  उचलत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते  कोठारी यांनी म्टटले आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करून जामखेड शहराला नियमीत वीजपुरवठा करावा अन्यथा याप्रश्री तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते कोठारी यांनी दिला आहे.
याबाबत कोठारी यांनी राज्याचे उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे , आ.रोहित पवार , जिल्हाधिकारी अतुल भोसले, महावितरणचे अधीक्षक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरिक्षक संभाजी गायकवाड यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.

No comments:

Post a Comment