गोरेगाव, हिवरेकोरडा, बहिरोबावाडी वनपरिक्षेत्रावर अग्नितांडव ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 13, 2021

गोरेगाव, हिवरेकोरडा, बहिरोबावाडी वनपरिक्षेत्रावर अग्नितांडव !

 गोरेगाव, हिवरेकोरडा, बहिरोबावाडी वनपरिक्षेत्रावर अग्नितांडव !

वन विभागास स्थानिकांच्या सहकार्याने आग विझवण्यास अखेर यश !


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः तालुक्यातील गोरेगाव , हिवरे कोरडा व बहिरोबावाडी हद्दीतील वनपरिक्षेत्रात साधारण 100 एकर व खासगी मालकीच्या 50 एकर क्षेञावर शुक्रवारी दुपारी 12 वाजल्यापासून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत अग्नितांडव पहावयास मिळाले. याबाबत सविस्तर वृत्त असे की , हिवरे कोरडा हद्दीतील वनपरिक्षेत्रात शुक्रवारी दुपारी 12.00 वा.अज्ञात व्यक्तिने आग लावली. डोंगरावर वाळलेले गवत मोठ्या प्रमाणात असल्याने हि आग प्रचंड वेगाने धुमसत होती.यामुळे आगीने काहि क्षणात रूद्र रूप धारण करत मोठा परिसर व्यापला होता. वनक्षेञाला आग लागली असल्याची माहिती शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांना बहिरोबावाडी येथील युवा शेतकरी गंगाधर देठे पाटील यांनी फोन करून दिली.अनिल देठे पाटील यांनी लागलीच यासंदर्भात वनविभागास फोन करून माहिती देत आग विझवण्यासाठी वन विभाने तातडीने मनुष्यबळ व फायर ब्लोअर मशिन पाठवावी अशी मागणी केली.वन विभागाने देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी किन्ही , बहिरोबावाडी गावातील तरूणांच्या मदतीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली.परंतु काही ठिकाणी गवत उंच वाढलेले असल्याने त्या ठिकाणी आगेचे मोठं , मोठे लोळ तयार होत असल्याने आग विझवण्यास मोठी अडचण येत होती याचं दरम्यान वनरक्षक श्री निलेश बडे यांनी फायर ब्लोअर मशिनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात आग विझवण्याचा प्रयत्न केला.अखेर स्थानिकांच्या मदतीने वन विभागाच्या कर्मचार्‍यांना यश मिळाले.परंतु तो पर्यंत 150 एकर क्षेञ आगेच्या भक्ष्यस्थानी आले.या आगित छोटि , मोठी झाडे , झुडुपे व वन्यजीव अक्षरशः होरपळून गेले.आगेचे तांडव पाहुन हरणांचे कळपचे कळप सैरावैरा पळत होते. उन्हाळ्यात दरवर्षी वनक्षेत्रावर आग लागते मग हि आग अतिउष्णतेमुळे लागते की , कुणी जाणीवपूर्वक आग लावतयं हे कोडं माञ अद्याप उलगडलेले नाही.माञ अशा घटनांमुळे वनविभागाचे व शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे.
आग विझवण्यासाठी शेतकरी नेते तथा ग्रामपंचायत सदस्य अनिल देठे पाटील व किन्ही , बहिरोबावाडी गावातील तरूण राजु व्यवहारे , मोहन मोढवे , संदिप खोडदे , दादाभाऊ मोढवे , संपत खोडदे , भिमराव देठे , राजेंद्र खोडदे , ओंकार खोडदे तसेच वन विभागाचे वनरक्षक निलेश बडे , वनकर्मचारी दादाराम तिकोणे , श्री सुर्यवंशी , गणेश गोळे आदिंनी अथक परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment