उद्धव ठाकरेंनी बोलावली आज सर्वपक्षीय बैठक ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 10, 2021

उद्धव ठाकरेंनी बोलावली आज सर्वपक्षीय बैठक !

 उद्धव ठाकरेंनी बोलावली आज सर्वपक्षीय बैठक !

तीन आठवड्याच्या लॉकडाऊनचे महसूलमंत्री थोरातांचे संकेत.

महाराष्ट्रात 28 दिवसाचा लॉकडाऊन करा, असं पत्र माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. सध्या जे निर्बंध आहेत ते वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे असल्याने गोंधळाची स्थिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महिनाभर असंच सुरु राहिलं तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल आणि परिस्थिती भयावह होईल. परिणामी महाराष्ट्राची संपूर्ण देशात बदनामी होईल, या पत्रात म्हटलं आहे. यामुळे आता नेमके लॉकडाऊन लागणार का? लागलेच तर किती दिवसांचे असेल ? की लॉकडाऊन ऐवजी आणखी निर्बंध कडक होणार हे बैठकीनंतरच कळेल. परंतु नागरिकांनी कोणत्याही प्रकारे अफवांना बळी पडू नये तसेच विनाकारण लॉकडाऊन लागेल या भीतीने गर्दी करू नये. कारण शासन निर्णय घेताना सर्व गोष्टी लक्षात घेऊनच आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही हे लक्षात घेऊनच निर्णय घेत असते.


संगमनेर -
तीन आठवड्यांचा लॉक डाऊन लावण्याबाबत आता विचार आणि चर्चा जनमानसात होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर आज पाच वाजता मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित असणार आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आता याबाबत संकेत दिले आहेत.
लॉकडाऊन करण्यास सुरवातीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोध केला होता. मात्र, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने थोरात थोडेसे मागे सरकलेले दिसतायेत. बाळासाहेब थोरात यांनी आणखी कडक निर्बंध राज्यात लागू करण्याबाबत सुतोवाच केलं आहे. ते संगमनेर येथे कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलले. कोरोनाची साखळी तोडून कोरोनाबळींची संख्या शून्यावर येत नाही तोपर्यंत काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यामुळे आणखी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं थोरात यांनी सांगितलं. पसरलेल्या कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला. भारत देशही त्याला अपवाद नाही. देशाचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळत आहेत. विविध जिल्ह्यांची आकडेवारी पाहिली तर चिंताजनक वातावरण आहे. त्याच प्रमाणे आता वैद्यकीय सुविधा अपुर्‍या पडू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment