चोरांकडील गोळीबारात दोन जण जखमी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 10, 2021

चोरांकडील गोळीबारात दोन जण जखमी.

 चोरांकडील गोळीबारात दोन जण जखमी.

शेळ्या चोरण्यासाठी चोर आले.


कर्जत (अशिष बोरा यांजकडून) -
शेळी चोरण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी केलेल्या गोळीबारात निंबोडी येथील रघुनाथ गरुड व भरत बर्डे जखमी झाले असून त्यांना नगर मधील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटना स्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी भेट दिली असून कर्जत पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.
सदर घटनेची हकीकत अशी की, कर्जत जामखेड तालुक्याच्या शिवेवर असलेल्या कर्जत तालुक्यातील निंबोडी येथे गावामध्ये मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास  चोरटे आले होते. त्यांनी प्रदीप गरड यांची शेळी चोरून घेऊन जात असताना प्रदीप गरड जागे झाले, त्यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांची इतर नातेवाईकही जागे झाले. त्यावेळी चोरट्यांनी शेळी घेऊन धूम ठोकली. परंतु सहा जणांनी त्यांचा पाठलाग केला. चोरट्यांचा पाठलाग करत असताना चोरट्यांनी त्यांच्याकडे असणार्‍या गावठी कट्टा मधून गोळीबार केला. यामध्ये रघुनाथ गरड व भरत बर्डे यांना जखमी झाले आहेत. या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी आले असून दोन जिवंत काडतुसे सापडली आहेत, जखमी रघुनाथ गरड (वय 50) वर्ष व भरत बर्डे (वय 35 ) यांना कर्जत येथे उपचारा साठी आणण्यात आले व येथून नगर येथे हलविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment