बहुप्रतीक्षित श्रीराज अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज या फर्मचा उद्घाटन समारंभ गुढीपाडव्याचे मुहूर्तावर संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, April 13, 2021

बहुप्रतीक्षित श्रीराज अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज या फर्मचा उद्घाटन समारंभ गुढीपाडव्याचे मुहूर्तावर संपन्न

 बहुप्रतीक्षित श्रीराज अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज या फर्मचा उद्घाटन समारंभ गुढीपाडव्याचे मुहूर्तावर संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या बहुचर्चित श्री.ओंकार बाळासाहेब आंबिलवादे यांच्या श्रीराज अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज या फर्मचा उद्घाटन सोहळा  नगर औरंगाबाद रोडवर  उस्थळ दुमाला जवळील   बाभूळवेडा येथे ह.भ.प.शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते  आणि देवगड संस्थांनचे ह.भ.प.भास्करगिरी महाराज ,कै.पांडुरंग शंकर अंबिलवादेआणि कै.गं.भा.रुख्मिणी पांडुरंग आंबिलवादे यांचे  शुभाशिर्वादाने   13 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संपन्न झाला.देवगड संस्थांनचे ह.भ.प.भास्करगिरी महाराज यांनी श्री गुरुदेव दत्त पिठाची  प्रतिमा भेट म्हणून दिली .
गेल्या अनेक वर्षांपासून फॅब्रिकेशन क्षेत्रामध्ये पल्लवी इंडस्ट्रीज या नावाने प्रचलित असलेल्या आणि नावाजलेल्या फर्मचा आता श्रीराज अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज  या नवीन नावाने  नवीन शाखेत पदार्पण होत आहे .शेतीसाठी लागणारी  सर्व प्रकारची अत्याधुनिक अवजारे आणि यंत्रे अत्यंत वाजवी किमतीत ग्राहकांना उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी श्री ओंकार बाळासाहेब अंबिलवादे यांनी सांगितले .कोरोणा या संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर सदरील कार्यक्रम हा कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत आणि घरगुती पद्धतीने पार पाडण्यात आला . यावेळी उपस्थितांचे देविदास पांडुरंग अंबिलवादे,  कैलास पांडुरंग अंबिलवादे, आणि बाळासाहेब पांडुरंग आंबिलवादे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here