ठाकरे सरकारने आ. धस यांच्या मागणीची घेतली दखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 13, 2021

ठाकरे सरकारने आ. धस यांच्या मागणीची घेतली दखल

 ठाकरे सरकारने आ. धस यांच्या मागणीची घेतली दखल


नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः आमदार सुरेश धस यांनी काल आष्टीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यभर रेमडेसीव्हीर औषधांचा काळाबाजार होत आहे. असल्याचा आरोप केला होता याकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. अशी मागणी केली होती याची दखल ठाकरे सरकारने घेतली आहे.
ज्यात कोरालस ररेमडेसीव्हर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण येत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र रेमडेसीव्हर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता जिल्हा स्तरावर कोल रूमची उभारणी केली जाणार आहे. राज्यात कोरणा रुग्णावरील उपचारांसाठी रेमडेसीव्हर इंजेक्शनची मागणी वाढत आहे. त्यात खासगी दुकानदार अव्वाच्या सव्वा किमतीने इंजेक्शन विकत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत ऑक्सिजन कोल रूम मध्ये रेमडेसीव्हर बाबत तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत. या तक्रारीचा निवारण स्थानिक अन्न व औषधे प्रशासनाच्या कार्यालयात मार्फत केले जाईल.
जिल्हास्तरावर एक तांत्रिक समिती गठीत करून त्यामार्फत विशिष्ट पद्धतीने खाजगी रुग्णालयात रेमडेसीव्हर चा उपयोग व्यवस्थित होत आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे. गरज भासल्यास राज्यस्तरा वरील एफ डी एच कोल रुमचशी संपर्क करून कारवाई केली जाणार आहे.जिल्हास्तरीय यासाठी कोल रूम स्थापन केली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.शनिवार दिनांक 9 एप्रिल रोजी आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथे पत्रकार परिषदेत घेतल्याने शनिवारी राज्य सरकारने त्यांच्या मागणीची दखल घेतली आहे.

No comments:

Post a Comment