गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे पुन्हा पेटू लागल्या चुली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, April 17, 2021

गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे पुन्हा पेटू लागल्या चुली

 गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे पुन्हा पेटू लागल्या चुली


नगरी दवंडी/प्रतिनिधी
गुंडेगाव ः गॅस खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने ग्रामीण भागात पुन्हा चुलीचा धूर निघू लागला आहे. घरगुती गॅस 145 रुपयांनी महागल्याने  आता गॅस सिलेंडरसाठी 865 रुपये मोजावे लागत आहे.
          प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ग्रामीण भागात घरोघरी गॅस आला. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांची चुलीच्या धुरापासून मुक्तता मुक्ती मिळाली. मात्र, गॅसच्या किंमतीत अचानक झालेली मोठ्या वाढीमुळे अहमदनगर  जिल्ह्यातील ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू.  लागल्या आहेत.
ग्रामीण भागातील महिलांची चुल्हीच्या धुरापासून मुक्तता करण्यासाठी उज्वल्ला योजनेतंर्गत शंभर रूपयात घराघरात गॅस पोचवला. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला. सध्या सर्व महिला गॅसवरच सगळा स्वयंपाक बनवू लागल्या असताना, दिवसेंदिवस गॅसची भाव वाढ सातत्याने सुरू असल्याने ग्रामीण कुटुंबाना गॅस भरणे कठीण झाले. त्यात गेल्या  आरठवड्यात गॅसचे दर 146 रूपयांनी वाढले.

कोरोना विषाणू महामारी आर्थिक परिस्थिती बिकट झाली आसून गुंडेगाव येथे वन विभागाने  प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस वाटप केले आसले तरी गॅस भरण्यासाठी पैसे नसल्याने पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत. - अनिता देवीदास भापकर (गुंडेगाव महिला)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here