सर्वांच्या सहकार्याने वउत्तम नियोजन केल्याने पतसंस्थेने विक्रमी नफ्याचा आलेख कायम ठेवला ः धूत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, April 9, 2021

सर्वांच्या सहकार्याने वउत्तम नियोजन केल्याने पतसंस्थेने विक्रमी नफ्याचा आलेख कायम ठेवला ः धूत

 सर्वांच्या सहकार्याने वउत्तम नियोजन केल्याने पतसंस्थेने विक्रमी नफ्याचा आलेख कायम ठेवला ः धूत


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोना जागतिक संकटाच्या कठीण काळात  सभासद , संचालक ,पदाधिकारी व कर्मचारी यांनी एकमेकांना पूरक साथ देत संस्थेच्या भरभराटीसाठी प्रचंड मेहनत घेऊन लौकीकात भर घातली. यामुळे संस्थेला अहवाल साली ‘अ’ वर्ग  मिळाला.तसेच दरवर्षी प्रमाणे 15 % लाभांश हि सभासदांना देण्यात आला. म्हणूनच सर्वांच्या सहकार्याने उत्तम नियोजन केल्याने पतसंस्थेने विक्रमी नफ्याचा आलेख कायम ठेवणे शक्य झाले असे मत श्री रामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडीट सोसायटीचे चेअरमन श्री.श्रीगोपाल धूत यांनी व्यक्त केले.
श्री रामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडीट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा आँनलाईन माध्यमाद्वारे चेअरमन श्रीगोपाल धूत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .यावेळी ते बोलत होते.या सभेस सर्व संचालक उपस्थित होते.
सभेच्या सुरवातीस प.पु.डोंगरे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व्हा.चेअरमन विश्वनाथ  कासट यांच्या हस्ते करण्यात आले.संस्थेचे मुख्य व्यवस्थापक श्री.पुंडलिक यांनी विषयपत्रिकेचे क्रमवार वाचन केले. आँनलाईन सभेस उपस्थित असणार्‍या सभासदांनी एक मताने सर्व विषय मंजूर केले.
अहवाल सालात संस्थेच्या ठेवी रु.7.10 कोटीने वाढून एकूण  ठेवी रु. 74.28 कोटी झाल्या आहेत.नफ्यात वाढ  होऊन  एकूण रु. 3.72 कोटींचा विक्रमी नफा संस्थेस झाला आहे.नेट एन.पी.ए 0 % आहे.
कोणत्याही आर्थिक संस्थेचे कर्ज न उचलता संस्थेने स्वभांडवलावर केलेली प्रगती आदर्शवत असून सर्व संचालकानी  दिलेल्या सहकार्याने हे शक्य झाल्याचे धूत यांनी सांगितले.
सन्माननीय सभासद डॉ.भंडारी,नंदलाल झंवर , शामशेठ सारडा,संजय लोढा यांनी आँनलाईन केलेल्या  सूचनांची संस्थेने दखल घेतली. सर्व कर्मचारी, सेवक वृंद ,अंतर्गत हीशोब तपासनीस सी.ए.तुषार  लोहे,सीए. पुनीत व्होरा,सीए पियुष गुजराथी,वेधानिक लेखा परीक्षक सिए अनुप्रीत झंवर , सभासद, उपस्थित सर्व संचालक  यांचे व्हा.चेअरमन श्री.विश्वनाथ कासट यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here