जनजागृती सामाजिक युवा प्रतिष्ठानला पाच सिलिंग फॅनची भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 9, 2021

जनजागृती सामाजिक युवा प्रतिष्ठानला पाच सिलिंग फॅनची भेट

 जनजागृती सामाजिक युवा प्रतिष्ठानला पाच सिलिंग फॅनची भेट

राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस बोरुडे यांचा सामाजिक उपक्रम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस गणेश बोरुडे यांनी स्वखर्चाने जन जागृती सामाजिक युवा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेला पाच सिलिंग फॅनची भेट दिली. आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रेरणने हा उपक्रम राबविण्यात आला.
आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते जन जागृती सामाजिक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र आढाव यांना सदर फॅन सुपुर्द करण्यात आले. यावेळी संभाजी पवार, राष्ट्रवादी सरचिटणीस गणेश बोरुडे, आढाव सर, दीपक खेकडर,  प्रवीण शिंदे, अमोल येवले, श्रीकांत कुटे आदी उपस्थित होते.  
गणेश बोरुडे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या माध्यमातून सामाजिक भावनेने कार्य सुरु असून, सामाजिक संस्थांनाही आधार दिला जात आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असताना सामाजिक संस्था दुर्बल घटकांना आधार देण्याचे कार्य करीत आहे. अशा सामाजिक संस्थाना सेभाभावाने आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फॅनची मदत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आमदार संग्राम जगताप यांनी कोरोनाच्या संकटात गरजूंना आधार देणे हीच खरी माणुसकी आहे. जन जागृती सामाजिक युवा प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य उत्तमप्रकारे सुरु असून, संस्थेला बोरुडे यांनी केलेली मदत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment