जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात एक हजार पाचशेजणांचे लसीकरण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 9, 2021

जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात एक हजार पाचशेजणांचे लसीकरण

 जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात एक हजार पाचशेजणांचे लसीकरण

नागरिकांकडून आरोग्य कर्मचार्‍यांचे कौतुक 


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यातील जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवार (दि.8) अखेर पर्यंत सुमारे एक हजार पाचशे रुग्णांचे लसीकरण करण्यात आले आहे.  
येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कर्डिले व डॉ. सुप्रिया थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेले लसीकरण आरोग्य कर्मचार्‍यांच्या योग्य नियोजनामुळे सुरळीत पार पडत असून परिसरातील नागरिकांकडून आरोग्य कर्मचार्‍यांचे कौतुक होत आहे.
आरोग्य केंद्रांतर्गत आज पर्यंत सुमारे एक हजार पाचशे नागरिकांना लस देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज कोरोनाची तपासणी करण्यात येत आहे. त्यातच लसीकरण सुरू असल्याने आरोग्य अधिकारी व कर्मचार्‍यांवर कामाचा ताण पडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तरीही आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकार्‍यांच्या योग्य नियोजनामुळे लसीकरण व तपासणी सुरळीतपणे सुरू आहे.
जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने पुरातन इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना बसण्यासाठी ही जागा उपलब्ध नाही. तरीदेखील लसीकरण व तपासणी मोहीम व्यवस्थितरीत्या सुरु असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

ग्रामस्थांच्यावतीने होणार सत्कार
आरोग्य कर्मचार्‍यांचे कार्य कौतुकास्पद -  जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या नियोजनामुळे तपासणी व लसीकरण्यासाठी नागरिकांची हेळसांड होत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांचे काम कौतुकास्पद आहे.
-भानुदास हसनाळे, निवृत्त पोलिस अधिकारी

ग्रामस्थांच्यावतीने होणार सत्कार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कर्डिले व डॉ.सुप्रिया थोरबोले यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचार्‍यांचा ग्रामस्थांच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच श्रीतेश पवार व माजी उपसरपंच बंडू पवार यांनी दिली.

No comments:

Post a Comment