अर्बन बँकेत ठेवीदारांनी ठेवी ठेवून आकर्षक व्याजदराचा लाभ घ्यावा ः अशोक कोठारी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 8, 2021

अर्बन बँकेत ठेवीदारांनी ठेवी ठेवून आकर्षक व्याजदराचा लाभ घ्यावा ः अशोक कोठारी

 अर्बन बँकेत ठेवीदारांनी ठेवी ठेवून आकर्षक व्याजदराचा लाभ घ्यावा ः अशोक कोठारी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर अर्बन बँक आज जिल्ह्याच्या आर्थिक क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावत भक्कमपणे पायावर उभी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सेवा आपल्या हजारो ग्राहकांना देत आहे. ठेवीदारांनी अर्बन बँकेत आपल्या बहुमोल ठेवी ठेवून आकर्षक व्याजदराचा लाभ घ्यावा, असें आवाहन अर्बन बँकेचे माजी चेअरमन श्री अशोक कोठारी व बँकेचे कायदेशीर सल्लागार अ‍ॅड सुभाष काकडे यांनी केले.
अर्बन बँकेचे माजी चेअरमन अशोक कोठारी, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. सुभाष काकडे व नातेवाईकांनी अर्बन बँकेत  ठेवी ठेवल्या. बँकेचे प्रशासक महेंद्रकुमार रेखी यांनी दोघांना ठेव प्रमाणपत्र दिले. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी सतीश शिंगटे, प्रमुख व्यवस्थापक एम.पी.साळवे, राजेंद्र डोळे, सुनील काळे व योगेश कुलकर्णी आदि अधिकारी उपस्थित होते.
यावेळेस बोलताना श्री अशोक कोठारी म्हणाले की नगर अर्बन बँकेच्या थकीत कर्जवसुलीसाठी तसेच ठेवी वाढविण्यासाठी बँकेस सर्वतोपरी सहकार्य करणार आहे यावेळी प्रशासक श्री महेंद्रकुमार रेखी म्हणाले, अर्बन बँकेचे हितचिंतक असलेले अशोक कोठारी व अ‍ॅड. सुभाष काकडे यांनी बँकेवर विश्वास व्यक्त करत ठेवलेल्या ठेवी अनमोल आहेत. अर्बन बँकेचे कामकाज उत्कृष्ठ व व्यवस्थित चालू आहे. यावेळी अशोक कोठारी व सुभाष काकडे यांनी आपला अर्बन बँकेशी जुना ऋणानुबंध असून लवकरात लवकर बँकेला पुन्हा पुर्नवैभव प्राप्त होवो अशी अपेक्षा व्यक्त केली.

No comments:

Post a Comment