म्हस्के हॉस्पिटलवर छापा. डॉक्टर दांपत्य फरार. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात उशीरा गुन्हा दाखल.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 13, 2021

म्हस्के हॉस्पिटलवर छापा. डॉक्टर दांपत्य फरार. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात उशीरा गुन्हा दाखल..

 म्हस्के हॉस्पिटलवर छापा. डॉक्टर दांपत्य फरार. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात उशीरा गुन्हा दाखल..

‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा काळाबाजार .


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना उपचारासाठी प्रभावी ठरलेल्या ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा जिल्ह्यातील काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने मोठं नेटवर्क उभारलंय. या नेटवर्कच्या माध्यमातून भिंगार नजीकच्या वडारवाडीतील डॉ. म्हस्के हॉस्पिटल मध्ये ‘रेमडेसिविर’ चा काळाबाजार होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास समजल्यावर हॉस्पिटलवर छापा मारण्यात आला. याप्रकरणी डॉ. किशोर म्हस्के याचासह चार जणांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. रोहित पवार, प्रशांत आल्हाट या दोघांना अटक केली आहे. डॉक्टर दांपत्य डॉ. किशोर म्हस्के आणि डॉ.कौशल्या म्हस्के हे फरार झाले आहेत. म्हस्के हॉस्पिटल येथील कोविड सेंटरमधून रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्यादराने विक्री होत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांना मिळाली होती.

म्हस्के हॉस्पिटलला कोविड रुग्णासाठी वापरण्यात येणार्‍या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या संशयावरून  सोमवारी रात्री पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन अधिकार्‍यांनी छापा घातला. निर्धारित किंमतीपेक्षा जास्त दराने इंजेक्शन येथे विकले जात होते. त्याचबरोबर येथे मोठ्या प्रमाणात इंजेक्शनचा साठाही आढळून आला असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली. म्हस्के हॉस्पिटलला कोविड केअर सेंटरच्या परवाण्यााची तपासणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांकडून झाली.
हॉस्पिटलमधील मेडिकलचे 14 हजार रुपयांचे बिल त्यांना मिळाले होते. त्यानुसार त्यांनी आज रात्री साडेदहा वाजता फौजफाट्यासह म्हस्के हॉस्पिटल येथे छापा घातला. या छाप्यात पोलिसांना मेडिकलमध्ये साठवून ठेवलेले रेमडेसिवीरचे 14 इंजेक्शन मिळाले आहेत. हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरू आहे. त्यासाठी आयसीयू असल्याचे रुग्णांना सांगितले जात होते. परंतु तेथे ऑक्सिजनची कोणतीही व्यवस्था नसल्याचे पाहणीत समोर आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये येथे करोनाबाधित रुग्णांचा मृत्यूचा आकडा मोठा आहे. तशा तक्रारीही प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्यातून या कोविड सेंटर विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. हे 65 बेडचे हॉस्पिटल काही दिवसांपूर्वीच तीन मजली बांधण्यात आलेले आहे. रात्री उशिरा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांमध्ये याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला.
आरोपी प्रसाद आल्हाट हा आरोपी रोहित पवार याच्या मदतीने म्हस्के हॉस्पिटलमधील डॉ. कौशल्या किशोर म्हस्के आणि डॉ. किशोर दत्तात्रय मस्के यांच्याशी संगनमत करून सध्या चालू असलेल्या कोविड-19 च्या आजाराचे औषध चैतन्य मेडिकल स्टोअर्स, भिंगार या ठिकाणावरून बेकायदेशीररित्या मिळवून स्वतःचे व डॉक्टरांचे आर्थिक फायद्याकरिता विना प्रिस्क्रिप्शन, विना कोविड तपासणी अहवाल 4800 रुपये किमतीचे रेमडीसेवीर इंजेक्शन हे चढ्या भावाने काळ्याबाजारात 12 हजार रुपये किमतीला विक्री करताना आढळून आले. आरोपींकडून 72 हजार 600 रुपयांचे 15 रेमडिसेवीर इंजेक्शन,  दहा हजार रुपये किमतीचा एक विवो कंपनीचा मोबाइल,  वीस हजार रुपये किमतीची एक हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची दुचाकी असा एक लाख दोन हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख हे करत आहेत.

No comments:

Post a Comment