गुरु अर्जुन देव कोविड केअर सेंटरला नाशिक विभागीय आयुक्तांची भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 9, 2021

गुरु अर्जुन देव कोविड केअर सेंटरला नाशिक विभागीय आयुक्तांची भेट

 गुरु अर्जुन देव कोविड केअर सेंटरला नाशिक विभागीय आयुक्तांची भेट

घर घर लंगर सेवेच्या सामाजिक कार्याचे कौतुक


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरात कोरोना संक्रमणाचे प्रादुर्भाव वाढत असताना घर घर लंगरसेवा व महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या हॉटेल नटराज येथील गुरु अर्जुन देव कोविड केअर सेंटरला नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भेट दिली. गमे यांनी कोविड सेंटरमधील डॉक्टर, कर्मचारी व रुग्णांशी संवाद साधून कोविड सेंटरच्या उत्कृष्ट नियोजन व कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. तर घर घर लंगर सेवेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले
यावेळी आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, डॉ. प्रदीप कळमकर, घर घर लंगर सेवेचे हरजीतसिंह वधवा, जनक आहूजा, प्रितपालसिंह धुप्पड, कैलाश नवलाणी, राहुल बजाज, प्रशांत मुनोत, किशोर मुनोत, करण धुप्पड, सुनील छाजेड, मनप्रीत धुप्पड, सनी वधवा, प्रमोद पंतम, पुरुषोत्तम बेट्टी आदी उपस्थित होते.
घर घर लंगर सेवेने महापालिकेच्या सहकार्याने दि.3 मार्च पासूनच हॉटेल नटराज येथे व महिलांसाठी जैन पितळे वसतीगृहात गुरु अर्जुन देव कोविड केअर सेंटरची उभारणी केली आहे. यामध्ये अनेक कोरोनाग्रस्त रुग्ण चांगले होऊन घरी परतले आहेत. पहिल्या टाळेबंदीत अनेकांना दोन वेळचे जेवण उपलब्ध करुन तसेच विविध सामाजिक उपक्रमाद्वारे शहरात मोठे सामाजिक कार्य उभे करुन सर्वांच्या मनात एक आदर व विश्वास निर्माण केला असल्याचे सांगून हरजितसिंह वधवा यांनी घर घर लंगर सेवेच्या सामजिक कार्याची माहिती दिली. घर घर लंगरसेवेच्या सामाजिक उपक्रमात अहमदनगर जिल्हा पोलीस दल व लायन्स क्लबचे सहकार्य लाभत आहे.

No comments:

Post a Comment