साई एशियन हॉस्पिटल वर कार्यवाही करा! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 9, 2021

साई एशियन हॉस्पिटल वर कार्यवाही करा!

 साई एशियन हॉस्पिटल वर कार्यवाही करा!

बिलासाठी मृत्यू प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ. मनपा कामगार युनियन ची मागणी...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः तारकपूर परिसरात असलेल्या साई एशियन हॉस्पिटलने महापालिकेच्या मयत महिला कर्मचारी तृृृप्ती राकेश चव्हाण यांचा मृृत्यू अहवाल (डेथ सर्टिफिकेट) देण्यास चव्हाण यांच्या नातेवाईकांनी बील न भरल्यामुळे दिलेला नाही. त्यामुळे केवळ थकित बिलांसाठीच मयत रुग्णाच्या नातेवाईकांची अडवणूक करणार्‍या साई एशियन हॉस्पिटलविरुध्द कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी केलीय.
महानगरपालिकेच्या मुख्यालयात काल दुपारी 12 वाजता पार पडलेल्या बैठकीत लोखंडे यांनी ही मागणी केली. या बैठकीस महापौर बाबासाहेब वाकळे, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, सभागृृृृह नेते रविंद्र बारस्कर, नगरसेवक प्रकाश भागानगरे, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, कामगार युनियनचे सरचिटणीस आनंदराव वायकर, उपाध्यक्ष बाबासाहेब मुदगल, विठ्ठल उमाप, शेख पाशा इमाम, अकील सय्यद आदी उपस्थित होते.
कामगार युनियनचे अध्यक्ष म्हणाले, साई एशियन हॉस्पिटलने मयत तृृृप्ती चव्हाण यांच्या नातेवाईकांची जाणीवपूर्वक अडवणूक केली आहे. बील थकल्याच्या कारणामुळे या दवाखान्याचे अडवणुकीचं धोरण माणुसकीला धरुन नाही. नातेवाईकांना चव्हाण यांचा मृृृृत्युचा अहवाल अद्यापही दिलेला नाही. त्यामुळे या हॉस्पिटलचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात यावा. दरम्यान, खासगी रुग्णालयात बिलांसाठी होणार्‍या अडवणुकीवरुन वैद्यकीय व्यवसायात सेवाभाव राहिला नसून या पवित्र क्षेत्राला धंद्याचं स्वरुप प्राप्त झालं असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

No comments:

Post a Comment