सायन्स व अध्यात्म यांच्या मेळातून साहेबांना लवकर बरे करु ः प्रशांत गडाख - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, April 17, 2021

सायन्स व अध्यात्म यांच्या मेळातून साहेबांना लवकर बरे करु ः प्रशांत गडाख

 सायन्स व अध्यात्म यांच्या मेळातून साहेबांना लवकर बरे करु ः प्रशांत गडाख

यशवंतराव गडाखांची प्रकृती नाजूक. पुण्यात उपचार चालू...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः माजी खासदार व ज्येष्ठ साहित्यीक यशवंतराव गडाख पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये कोरोनाशी झुंज देत असताना त्यांचे पुत्र प्रशांत गडाख यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट केली असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून माझे वडील पुण्याला दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कोरोना झाल्यामुळे अ‍ॅडमिट आहेत. त्यांना भेटता येत नाही, भेटण्यास देखील मनाई आहे. ते सिरीयस आजारी आहे. मला तुमच्याकडून सहानभूती नको. साहेब अनेक प्रार्थना स्थळांवर नेहमी सांगत असतात जिथं सायन्स संपत तिथून पुढं अध्यात्म सुरू होत. नेवाश्यात, नगर जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातलाय. आपल्याला सगळ्यांनाच आता प्रार्थना मागायची आहे. आपण आपापल्या घरी राहून प्रार्थना करायची प्रार्थनेतनं सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सायन्स आणि अध्यात्म यांच्या मेळातून आपल्या साहेबांना लवकरच बर करू धन्यवाद ... या पोस्ट सोबतच त्यांनी गडाख यांचा दवाखान्यात उपचार घेत असलेला फोटो ही शेअर केला आहे. खासदार यशवंतराव गडाख यांची प्रकृती नाजूक बनली आहे, त्यांना लवकर बरे वाटावे यासाठी नगर जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांनी देवाकडे प्रार्थना केल्या आहेत.  गडाख यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना 7 एप्रिलला कोरोनाची लागण झाली होती. कुटुंबातील इतर सदस्य यातून सहिसलामत बाहेर आले मात्र गडाख यांचे वय व काही जुन्या व्याधींमुळे त्यांना त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील मंगेशकर हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here