कोरोनाचा आजही उद्रेक. आरोग्य सुविधांचा तुटवडा.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, April 17, 2021

कोरोनाचा आजही उद्रेक. आरोग्य सुविधांचा तुटवडा..

 कोरोनाचा आजही उद्रेक. आरोग्य सुविधांचा तुटवडा..

24 तासात 3,280 कोरोना पॉझिटिव्ह

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या उच्चांकामुळे भयस्थिती निर्माण झाली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा, कोरोना प्रतिबंध लसचा तुटवडा असतानाच आज जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळले आहेत. आजही कोरोना संसर्गाचा आकडा तीन हजारांपुढे गेला आहे. लागोपाठ तिसर्‍यांदा हा आकडा तीन हजारांपुढे गेला आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये  3 हजार 280 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे.
नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळले असून, ते नऊशेजवळ पोहोचला आहे. नगरमधील 887 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरापाठोपाठ नगर तालुक्यात तीनशे पुढे आणि राहाता तालुक्यातील रुग्णसंख्या तीनशेजवळ आहे. अहमदनगर शहर 887, राहाता 280, संगमनेर 184, श्रीरामपूर 189, नेवासे 95, नगर तालुका 341, पाथर्डी 98, अकोले 137, कोपरगाव 152, कर्जत 236, पारनेर 101, राहुरी 186, भिंगार शहर 68, शेवगाव 164, जामखेड 48, श्रीगोंदे 46, इतर जिल्ह्यातील 55 जणांना कोरोना आणि मिलिटरी हॉस्पिटलमधील 13 जणांना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 798, खाजगी प्रयोगशाळेनुसार 808 आणि रॅपिड चाचणीमध्ये 1674 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here