निर्जन स्थळी बोलावून लुटले! मुद्देमालासह 3 आरोपी गजाआड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 17, 2021

निर्जन स्थळी बोलावून लुटले! मुद्देमालासह 3 आरोपी गजाआड

 निर्जन स्थळी बोलावून लुटले! मुद्देमालासह 3 आरोपी गजाआड

स्वस्तात सोने... नंतर आता स्वस्तात गोडेतेल डबे देण्याचे आमिष...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून लुटण्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. पण आता स्वस्तात गोडेतेल डबे देण्याचे आमिष दाखवून लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी गजाआड केली असून त्यांनी लुटलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

हर्षल शिवशंकर चौधरी, वय 31. रा.अकलूज ता.माळशिरस जि.सोलापूर यांना नगर तालुक्यातील वाळकी येथील राहुल भोसले वय.22 वर्षे, कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील दगु भोसले, वाळकीतील उरूस चव्हाण यांनी स्वस्तात गोडेतेल देण्याचे आमिष दाखवून ‘घोसपुरी’ तील निर्जन स्थळी बोलावून मारहाण करून रोख रक्कम, मोबाईल, मनगटी घड्याळ असा 76,000 रु. किंमतीचा ऐवज लुटला. दि 14 एप्रिल 2021 ला हर्षल चौधरी यांचे फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून या गुन्ह्याच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वतंत्र पोलीस पथक नेमून आरोपी शोधण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनील कटके, सपोनि मिथुन घुगे, गणेश इंगळे, दत्तात्रय हिरडे, बबन मखरे, सुनील चव्हाण,  संदीप पवार, रवी सोनटक्के, आकाश काळे, प्रकाश वाघ, दीपक शिंदे, बबन बेरड या पोलिस पथकाने, तसेच नगर तालुका सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, पोसई जारवाले, आबनामे यांनी घटनास्थळी भेट घेवून आरोपींची माहिती घेऊन त्यांना वेगवेगळ्या ठिकाणा वरून अटक केली.
आरोपींना विश्वासात घेवून गुन्हातील चोरलेल्या मुद्देमाला बाबत चौकशी केली असता आरोपींनी चोरलेल्या मुद्देमालापैकी 10,000 रु कि.चा आयफोन अ‍ॅप्पल मोबाइल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेला 5,000 रु.कि.चा ओपो कंपनीचा मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली 50,000 रु. कि.ची होंडा कंपनीची स्मार्ट मॉडेलची मो.सा.नं. एमएच-16-सीएन-7067 असा एकूण 65,000 रु.कि.चा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेला आहे. या आरोपींच्या विरुद्ध नगर तालुका, कोपरगाव तालुक्यातही यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई मनोज पाटील साहेब पोलीस अधिक्षक अहमदनगर, सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक, अजित पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी, नगर ग्रामीण विभाग अहमदनगर, यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व नगर तालुका पो.स्टे.चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment