बाबासाहेबांना महासत्यबोधी मानवंदना देऊन जातीअंत चळवळीचा प्रचार-प्रसार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, April 14, 2021

बाबासाहेबांना महासत्यबोधी मानवंदना देऊन जातीअंत चळवळीचा प्रचार-प्रसार

 बाबासाहेबांना महासत्यबोधी मानवंदना देऊन जातीअंत चळवळीचा प्रचार-प्रसार

डॉ. आंबेडकरांची जाती अंताची लढाई पुढे चालविण्यासाठी संघटनांचा पुढाकार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जाती अंताची लढाई पुढे चालविण्यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. त्यांच्या जयंती दिनी बुधवार दि.14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महासत्यबोधी मानवंदना देऊन जातीअंत चळवळीचा प्रचार प्रसार केला जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
हजारो वर्ष वेदांचा डांगोरा पिटणार्या भारतीय समाजाने जातीव्यवस्था पोसून देशाला अर्धांगवायू आणला आहे. जाती व्यवस्थेने समाजाचा विकास खुंटला आहे. जातीअंतासाठी बाबासाहेबांनी दूर दृष्टिकोनाने प्रभावी लढा दिला. देशाला धर्मनिरपेक्षावर आधारित घटना देऊन त्यांनी स्वतंत्र्य, समता, बंधुताची मुल्य रुजवली. जैवविज्ञानाशी विसंगत भारतीय जाती व्यवस्था आणि जैविक धारणा चुकीच्या पद्धतीने राबवून विज्ञानाशी विसंगत तर्कशास्त्र मोडीत काढून जाती पोसल्या गेल्या. त्याचा परिणाम हजारो वर्षे भारतीय उपखंडातील मानवी समाजाची प्रगती ठप्प झाली. बाबासाहेबांनी विज्ञानवादाचा वापर करुन जाती नष्ट करण्यासाठी भारतीय उपखंडाच्या भल्यासाठी महान कार्य केले. यासाठी त्यांना महासत्यबोधी मानवंदना देण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
संघटनांच्या वतीने मानवी कल्याण व विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जाती अंताची लढाई पुढे चालविण्यासाठी प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. ही चळवळ घरोघरी पोहचवून जातीच्या उतरंडी नष्ट करण्याचा संकल्प संघटनेने घेतला आहे. या चळवळीसाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, जालिंदर बोरुडे, वीरबहादूर प्रजापती, अशोक भोसले, विठ्ठल सुरम, हिराबाई ग्यानप्पा, शाहीर कान्हू सुंबे, पोपट भोसले, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here