डॉ. आंबेडकरांची जयंती नेवासा फाटा येथे साध्या पध्दतीने साजरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, April 14, 2021

डॉ. आंबेडकरांची जयंती नेवासा फाटा येथे साध्या पध्दतीने साजरी

 डॉ. आंबेडकरांची जयंती नेवासा फाटा येथे साध्या पध्दतीने साजरी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत उत्साहात पण साध्या पध्दतीने नेवासा फाटा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली .यावेळी मुकिंदपूर येथील सरपंच सतीश (दादा )निपुंगे,घटनांपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी भालेराव,पोलिस पाटील आदेश साठे, बबलू साळवे,बाळासाहेब केदारे,पप्पू इंगळे.प्राध्यापक सोनवणे सर,सुनील हिरवे,गणपत मोरे,लिहिनार मामा,कृष्णा जाधव,दिनेश सर्गेये,आदी अनुयायांनी मानवंदना दिली.
यावेळी मुकीदपूरचे पोलीस पाटील आदेश साठे यांनी बोलताना या कोरोणा महामारीमध्ये  महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचं नागरिकांनी कडेकोट पालन करावं,व या आजाराला हरवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,या जयंतीनिमित्त खर्‍या अर्थाने हीच खरी मानवंदना होईल  असे यावेळी त्यांनी सांगितले.
या वेळी पो. हवालदार शिंदे,होमगार्ड सौ.सावंत,होमगार्ड श्री कदम.आदीनी चोख बंदोबस्त ठेवला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here