रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली. भाजी मार्केट, दाळमंडईत गर्दी ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, April 12, 2021

रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली. भाजी मार्केट, दाळमंडईत गर्दी !

रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली. भाजी मार्केट, दाळमंडईत गर्दी !

विकेंड लॅाकडाऊन संपला!नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः शुक्रवारी संध्याकाळी सुरू झालेला वीकेेंड लॅाकडाऊन आज सकाळी संपला.. नी दोन दिवस निर्मनुष्य असणार्‍या सर्वच रस्त्यांवर आज सकाळपासून टू व्हीलर, फोर व्हीलर, टेम्पो, रिक्षांची मोठी वर्दळ दिसू लागली. नागरिकही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दिसू लागले. 14 किंवा 15 एप्रिलला राज्य शासन लॅाकडाऊन करणार याची खात्री झाल्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त खरेदी करण्यासाठी भर दिली. मिनी लॅाकडाऊन असल्यामुळे दुकानदारांनी दाळमंडई, तर नागरिकांनी भाजी मार्केटमध्ये मोठी गर्दी केली.
शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी नागरिकांनी विकेंड लॅाकडाऊनला मोठा प्रतिसाद दिला. रस्त्यावर पूर्णपणे शुकशुकाट दिसून आला. शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहने, नागरिक तुरळक प्रमाणात दिसून आले. पण आज मात्र नागरिकांनी घराबाहेर पडून आपल्या नियोजित कामांना प्राधान्य दिले. उद्या गुढीपाडवा असल्यामुळे नागरिकांनी खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत धाव घेतली. पण कापड बाजार, सराफ बाजार बंद असल्यामुळे नागरिकांचा मोठा हिरमोड झाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here