नगरमध्ये ३० एप्रिलपर्यंत दशक्रिया विधी बंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 12, 2021

नगरमध्ये ३० एप्रिलपर्यंत दशक्रिया विधी बंद.

नगरमध्ये ३० एप्रिलपर्यंत दशक्रिया विधी  बंद.



नगरी दवंडी

अहमदनगर– कोरोनाने अहमदनगर जिल्ह्यात चांगलाच हौदोस घातला आहे. कोरोनाचे वाढते प्राबल्य पाहता चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अनेक उपाययोजना अवलंबल्या जात असतानाही कोरोनाचे रुग्ण कमी होताना दिसत नाहीत. आता याच पार्श्वभूमीवर नगरमध्ये होणाऱ्या सर्व दशक्रिया विधी ३० एप्रिलपर्यंत न करण्याचा निर्णय पुरोहित संघटनेने घेतला असल्याची माहिती जिल्हा पुरोहीत मंडळाचे अध्यक्ष किशोर जोशी यांनी दिली.

अहमदनगरमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. अनेक रुग्णांचा मृत्यूही होत आहे. अंत्यविधी व दशक्रियाविधीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोना बाधित झाले आहेत. अनेक जण आजारी आहेत. नागरिक मृत झालेला व्यक्ती कोरोना बाधित असल्याची माहिती पुरोहितांना देत नाहीत. तसेच त्यांचे नातेवाईक, मुले, विधी करणारे यजमान, कोरोना बाधित असल्याची माहिती लपवत आहेत. त्यामुळे पुरोहितांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून पुरोहितांची सुरक्षितता या दृष्टीने अहमदनगर जिल्हा पुरोहीत मंडळाने ३० एप्रिलपर्यंत अमरधाममध्ये कोणतेही धार्मिक विधी केले जाणार नाहीत, असा सर्वानुमते निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment