कोरोना रुग्णांची ऑक्सीजन, व्हेंटिलेटर बेडसाठी पळापळ. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 12, 2021

कोरोना रुग्णांची ऑक्सीजन, व्हेंटिलेटर बेडसाठी पळापळ.

 कोरोना रुग्णांची ऑक्सीजन, व्हेंटिलेटर बेडसाठी पळापळ.

..पण पालकमंत्रीच गायब


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पुण्यातील, नाशिक मधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्या त्या जिल्हयातील पालकमंत्री अजित पवार, छगन भुजबळ त्या जिह्यात ठाण मांडून बसलेत परंतू अहमदनगर जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी वार्‍यावर सोडलाय. पालकमंत्री हसन मुश्रीफ गायब झाले आहेत. जिल्हाधिकारी, प्रामाणिकपणे  ऑक्सिजन सिलेंडर, रेमडीसिविर इंजेक्शन पुरवठ्यसाठी प्रयत्न करत आहेत, परंतू ते उपलब्ध होत नाही  रेमडीसिविर इंजेक्शन, ऑक्सीजन सिलेंडर, कोरोना रुग्णांना उपलब्ध करा नाहीतर राजीनामा द्या अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी केली आहे.
कुठल्याही प्रकारची नियमावली आरोग्य मंत्रालया विभाग मार्फत दिली जात नाही . त्यामुळे कुठलेही नियंत्रण या जिल्ह्यावर  पालकमंत्र्यांचे नाही . जिल्ह्यात कोरोना आजारावर उपचार घेणार्‍या रूग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड उपलब्ध होण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर. तसेच रेमडीसिविर इंजेक्शनचा पुरवठा सर्वस्वी जबाबदारी हि पालकमंत्र्यांची असुन अजुन पर्यंत या उद्भवलेल्या परिस्थितीवर पालकमंत्र्यांचे एकही स्टेटमेंट नाही. जिल्हयात व शहरात ऑक्सिजन सिलेंडर, रेमडीसिविर इंजेक्शन आहेत का नाही या कडे लक्ष्य नाही असेही भुतारे म्हणाले. जिल्ह्यात तसेच शहरात रुग्णांचे नातेवाईक रेमडीसिविर इंजेक्शनसाठी वणवण फिरत आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे हॉस्पिटलचे डॉक्टर हतबल झाले आहेत. ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्यामुळे कोरोना रूग्णांना ऑक्सीजन, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नाही. हा सर्व पुरवठा व्हावा या करिता पालकमंत्री साहेब जबाबदार असतात परंतु जसा जिल्हयात, शहरात रेमडीसिविर, ऑक्सीजन तुटवडा निर्माण झाला तसे पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्ह्यातून प्रशासकीय कामातून गायब झाले आहेत.

No comments:

Post a Comment