साहेब.. शब्द पाळा! खाजगी हॉस्पिटलला पाठीशी घालू नका! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 6, 2021

साहेब.. शब्द पाळा! खाजगी हॉस्पिटलला पाठीशी घालू नका!

 साहेब.. शब्द पाळा!  खाजगी हॉस्पिटलला पाठीशी घालू नका!

जिल्हाधिकार्‍यांना मनसेचे वाढीव बिलाबाबत निवेदन..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शरद पवार यांच्या दौर्‍यात मनसेकडून होणारे आंदोलनं मागे घ्यावे. यापुढे खाजगी हॉस्पिटलची वाढीव बिलांची रक्कम परत मिळवून देण्याची जबाबदारी माझी असा शब्द जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिला होता. त्यामुळे आपण दिलेला शब्द पाळा तसेच वाढीव बिलांची रक्कम परत मिळवून देण्याची जबाबदारी आपलीच आहे त्यातुन तुम्ही पळ काढू नका खाजगी हॉस्पिटल च्या डॉक्टरांना पाठीशी घालू नका. या पुढे हि सर्व जबाबदारी महानगर पालिकेवर सोपवली तर वाढीव बिलांची रक्कम परत सर्व सामान्य जनतेला लवकर मिळणार नाही.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात भुतारे यांनी म्हटले आहे की, महानगर पालिका हि भ्रष्टाचार करणारी मोठी कंपनी आहे त्यामुळे त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. आजही खाजगी हॉस्पिटलची वाढीव बिलांची तक्रार आमच्याकडे येत आहे परंतू महानगरपालिकेचे यावर कुठलेही नियंत्रण नाही सरकारी बेड फुल झाल्यामुळे खाजगी हॉस्पिटल मध्ये सर्वसामान्यांना उपचार करावे लागत आहे. ईतर रुग्णांच्या बिलांची रक्कम एकुण काही सर्वसामान्य रुग्ण घरीच उपचार घेत आहे. महानगरपालिकेच्या अश्या हलगर्जी पणामुळे आपण खाजगी हॉस्पिटलच्या वाढीव बिलांच्या तक्रारी चोकशी समिती आपल्या उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांच्याकडेच अंतर्गत ठेवावी  त्यांच्यामुळेच आजपर्यंत 1 कोटी 22 लाख रूपये एवढी वाढीव बिलांची वसुल पात्र रक्कम खाजगी हॉस्पिटल मधील बिलांच्या चौकशी मुळे समोर आली त्यामुळे आपान मनसेला दिलेला खाजगी हॉस्पिटलचा वाढीव बिलांची तपासणी तसेच पैसे परत मिळवून देयचा शब्द पाळा दिलेल्या शब्दाला जागा. असे मत मनसे सचिव नितीन भुतारे यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांचेकडे व्यक्त केले आहे.
आज कोरोना च्या दुसर्‍या लाटेची परिस्थिती पाहता. मनसेचे प्रशासनाला सहकार्याची भूमिका आहे परंतू अशीच जर खाजगी हॉस्पिटलची लूटमार चालु राहिली तर आंदोलनं हे काही मनसेला नविन नाहि त्यामुळे या सर्व परिस्थितीवर आपण बारीक लक्ष्य द्यावे आजही अनेक रुग्णाची खाजगी हॉस्पिटल मध्ये पिळवणूक होत आहे अनेकांना डिस्चार्ज देण्यात आला परंतू पैश्या अभावी त्यांना डिस्चार्ज घेता येत नाही त्यामुळे पुन्हा वाढीव बिलाची चौकशी करुण खाजगी हॉस्पिटल मध्येच बिलांच्या चोकशी साठी अधिकार्‍यांची नेमणूक करावी तसेच मागील राहिलेल्या वाढीव बिलाची वसुल पात्र रक्कम आपण दिलेल्या शब्दा प्रमाणे संबंधित रुग्णांचा नागरिकांच्या बँक खात्यात जमा करावी
काल लॉक डाऊन बाबत पत्रकारांशी संवाद साधताना. खाजगी हॉस्पिटल मधील वाढीव बिलांची तपासणी तसेच मागील वाढीव बिलांची रक्कम परत देण्याबाबचा निर्णप्रक्रियेत महानगरपालिका आयुक्त पाहतील त्यांच्या अधिकार्‍यानं मार्फत या पुढे चोकशी करुण कारवाई केली जाईल. असे सांगितले त्यामुळे मनसेच्या वतीन जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन 23/01/2021 च्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली. खाजगी हॉस्पिटल मधील कोरोना आजारावर उपचार घेतलेल्या रुग्णाची वाढीव बिलांची रक्कम परत मिळावी तसेच कोरोणच्या दुसर्‍या लाटेत खाजगी हॉस्पिटल शासन नियम डावलत असुन कुठल्याही प्रकारे शासन नियम दराप्रमाणे बिले दिली गेली जात नसल्यामुळें रुग्णांना पुन्हा लाखों रुपयांची बिले हे सर्व सामान्य जनतेला भरावी लागत असल्यामुळे मनसेच्या वतीने नितीन भुतारे यांनी जिल्हाधिकारी व महानगर पालिका आयुक्तांना आज निवेदन दिले. या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेन्द्र राशीनकर, उपजिल्हाध्यक्षमनोज राऊत, महिला जिल्हाध्यक्ष अ‍ॅड अनिता दिगे, तसेच सर्व उपशह राध्यक्ष्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment