अण्णांनीही टोचली कोरोना प्रतिबंधक लस! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, April 6, 2021

अण्णांनीही टोचली कोरोना प्रतिबंधक लस!

 अण्णांनीही टोचली कोरोना प्रतिबंधक लस!

नागरिकांना लसीकरणास प्रतिसाद देण्याचे केले आव्हान..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज पारनेर येथील ग्रामीण रूग्णालयात येऊन ‘कोव्हीशिल्ड’ ही करोना प्रतिबंधक लस घेतली. आज सकाळच्या सुुमारास लस घेण्यासाठी हजारे ग्रामीण रूग्णालयात पोहचले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे तसेच डॉ. अभिलाशा शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. वैद्यकिय अधिकार्‍यांच्या दालनामध्ये गेल्यानंतर परिचारीका शेळके यांनी त्यांना लस दिली.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे, वैद्यकिय अधिकारी डॉ. अभिलाशा शिंदे अण्णांचे सहकारी दिलीप देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. लसीकरणानंतर दोन दिवस त्रास होण्याची शक्यता असल्याने अण्णांनी आराम करावा अशी विनंती डॉ. लाळगे यांनी यावेळी केली. काही त्रास झालाच तर सोबत काही औषधेही देत असल्याचे डॉ.लाळगे यांनी सांगितले. त्यावर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर नागरीकांच्या भेटी बंद करण्यात आल्या असल्याचे हजारे यांनी सांगितले. भेटी बंद असल्याने सध्या आपण आरामच करीत आहोत असेही ते म्हणाले. पंधरा दिवसांपूर्वीच लस घेण्याचे निश्चित केले होते. परंतू मणक्याचा आजार बळावल्यामुळे लसीकरणास विलंब झाल्याचेे अण्णा म्हणाले. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढतो आहे. नागरीकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. सध्या केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. आवश्यकता असेल तरच नागरीकांनी घराबाहेर पडावे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असून नागरीकांनी सहकार्य केले तरच त्यात यश येणार असल्याने नागरीकांनी आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे अशी अपेक्षा हजारे यांनी व्यक्त केली. दरम्यान्, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबतही गैरसमज करून न घेता नागरीकांना लसीकरणास प्रतिसाद देण्याचेही हजारे यांनी आवाहन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here