पुन्हा एकदा लॉकडाऊन, हे महाराष्ट्रातच का घडतयं? ः राज ठाकरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, April 6, 2021

पुन्हा एकदा लॉकडाऊन, हे महाराष्ट्रातच का घडतयं? ः राज ठाकरे

 पुन्हा एकदा लॉकडाऊन, हे महाराष्ट्रातच का घडतयं? ः राज ठाकरे

मुंबई : 10वी आणि 12 वीची परीक्षा घेऊ नये असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुचविले. खेळाडूंना सरावास परवानगी द्यावी. शेतकर्‍यांना हमी भाव द्यावा. मुलांचं वर्ष वाया गेलंय आणि शाळा फी आकारत आहेत. सलून 2-3 खुली ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी राज ठाकरेंनी केली.  मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक वाटल्याचे ते म्हणाले. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुख्यमंत्र्यांशी झूम कॉलद्वारे संवाद साधला. यावेळी झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. पुन्हा एकदा लॉकडाऊन हे महाराष्ट्रातच का घडतंय ? बंगालमध्ये वैगरे निवडणूक सुरू आहेत. मात्र महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडतात. इतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोजली जात नाही. तिथेही रुग्ण अधिक असणार असे राज ठाकरे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here