पोटातील बाळासह पत्नीची तलावात ढकलून हत्या !चारित्र्यावर संशयाचा किडा वळवळला... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, April 6, 2021

पोटातील बाळासह पत्नीची तलावात ढकलून हत्या !चारित्र्यावर संशयाचा किडा वळवळला...

 पोटातील बाळासह पत्नीची तलावात ढकलून हत्या !चारित्र्यावर संशयाचा किडा वळवळला...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः तिच्या पोटातील बाळाच्या आगमनाची ती वाट पाहत असतानाच पतीच्या मनात मात्र संशयाचं काहूर माजलं होतं. तिच्या पोटातील बाळ हे आपले आहे हे तो मानायला तयार नव्हता. संशयाचं भूत त्याच्या मनातून उतरत नव्हतं. अखेर या संशयातून त्याने तिच्या हत्तेचा कट रचला तिच्या पोटाला दगड बांधून तिला तलावात ढकलून दिलं. एक चिमुकला जीव आणि त्याची आई अनंतात विलीन झाली. ही घटना आहे पारनेर तालुक्यातील वाघ वाडी येथील सौ. नंदा जाधव, पोपट जाधव पती-पत्नीची.... फरार पोपटला पोलिसांनी गजाआड केलय. त्याने हत्येची कबुलीही दिलीय.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिच्या हत्येचा कट रचला. तिचा मृतदेह तलावातून बाहेर येऊ नये तिच्या पोटाला मोठा दगड बांधून तिला तलावात फेकून दिले तरीही मृतदेह तलावात तरंगून वर आल्यामुळे खूनाला वाचा फुटली.याबाबत सविस्तर माहिती अशी कि, चार वर्षापूर्वी नंदा जाधव यांचा पोपट जाधव याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर अपत्य होत नसल्याने आरोपी पोपट जाधव पत्नी नंदा हिला नेहमी त्रास देत असे. गेल्या पाच महिन्यांपासून नंदा जाधव गरोदर होती.
ती गरोदर असल्याचे समजल्यानंतर आरोपी पोपट जाधव तिच्या चारित्र्यावर संशय घेत असायचा. याच कारणाने त्याने दि. 30 मार्च रोजी नंदा जाधव हिच्या पोटाला दगड बांधून तलावात टाकून दिले. त्यानंतर रविवारी ही घटना उघडकीस आली. आरोपी पोपट जाधव घटनेनंतर फरार झाला होता. पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली असून त्याने हत्येची कबुली दिली आहे. पारनेर तालुक्यातील वाघवाडी येथे हि संतापजनक घटना घडली असुन ह्यानंतर परिसरात खळबळ माजली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here