माका परिसरातील गर्दी काही केल्या कमी होईना ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, April 14, 2021

माका परिसरातील गर्दी काही केल्या कमी होईना !

 माका परिसरातील गर्दी काही केल्या कमी होईना !


नगरी दवंडी/प्रतिनिधी

माका ः कोरोनाच्या दुसरयांलाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाअधिकारयांच्या आदेशानुसार,आठवडे बाजार बंद करूनही,नेवासे तालुक्यातील माका परिसरात सोमवार सोडून मंगळवारी मोठ्या प्रमाणात बाजार भरत असुन, अत्यावश्यक सोडुन इतर दुकाने,अवैध व्यवसाय,कायमच लॉकडाऊनचे बंधन न पाळता,विक्रेत्यांकडुन मनमानी दरात मालाची विक्री करत,सर्वसामान्यांची आर्थिक लुट  सुरू असल्याने,याबाबत स्थानिक प्रशासन स्वहितासाठी कायमच कोरोनाबाबत नियम व सूचनांचे पालन न करता, दुर्लक्ष करत असल्याचे पहावयास मिळत आहे.                        
याबाबतची माहिती अशी,स्थानिक प्रशासकीय कर्मचारी वर्गाच्या नाकर्तेपणामुळेच जवळपास सुमारे आठ ते नऊ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात मोठ्या प्रमाणात  बाजार भरत असुन, किराणा, भाजीपाला, फळे, चहा हॉटेल, मिठाई, स्टेशनरी, मावा गुटखा, जेवणाची धाबे, बेकायदा दारु दुकाने ,चिकन मटण दुकाने कोरोनाबाबतीत सुचना व नियमांचे पालन न करता राजरोसपणे चालू असुन, विक्रेते आपल्या मालाची विक्री रास्त भावात न करता, मनभावने मालाच्या दरापेक्षा दुप्पट तिप्पट दरात करत असल्याबाबत,तसेच पटलं तर घ्या अशा तिखट शब्दांत ग्राहकांस दमदाटी करून विकत असल्याबाबत चर्चाही केली जात आहे.
यासंदर्भात, वरिष्ठांकडुन ग्रामपंचायत, तलाठी, संबधित पोलिस प्रशासन,आरोग्य विभाग यासारख्या जबाबदारी झटकू पहाणारयां स्थानिक प्रशासकीय कार्यालयास समज देवुन कोरोनाच्या महाघातक संकटाबाबत उपाय योजने विषयी माहिती विचारणा करुन, दुकानदारांकडुन होत असलेले सर्व सामान्यांचे आर्थिक शोषण थांबवणे  याबाबत सुचना करणे गरजेचे आहे. याचबरोबर दुकानांची पहाणी करून, रास्त भाव फलक सर्व दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या समोर लावण्याची सक्ती केली जावी.बाजारतळावरील तसेच इतरत्र रस्त्यावरील गर्दी, तसेच विनाकारण गर्दी करणारयांवरती, नियमांचे उल्लंघन करणारयां दुकानदारांवरती, बेकायदा व्यावसायीक तसेच कोरोना साथीबाबतचे गांभीर्य न पाळता, आपले स्वहित बाळगणारयां बेजबाबदार स्थानिक प्रशासकीय कार्यालयीन कर्मचारी वर्गावरती नियम व सूचनांचे पालन न केल्यास कारवाई करण्यात यावी.अशी चर्चा सध्यातरी चालू आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here