मल्लविद्या संस्कार कुस्ती फौंडेशनच्यावतीने 11 हजार रुपये आरोळे कोव्हीड सेंटरला मदत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, April 14, 2021

मल्लविद्या संस्कार कुस्ती फौंडेशनच्यावतीने 11 हजार रुपये आरोळे कोव्हीड सेंटरला मदत

 मल्लविद्या संस्कार कुस्ती फौंडेशनच्यावतीने 11 हजार रुपये आरोळे कोव्हीड सेंटरला मदत


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः
संपूर्ण देशात कोरोणा संसर्ग वाढत असून जामखेड मध्ये ग्रामीण आरोग्य प्रकल्प आरोळे हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मोफत सेवा केली जाते. सामाजिक भान जपत मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन चे संस्थापक उपमहाराष्ट्र केसरी बबन काका काशीद यांच्या वतीने आरोळे हॉस्पिटल यांना अकरा हजार रुपये धनादेश देऊन मदत करण्यात आली.
यावेळी डॉ शोभाताई आरोळे जामखेडचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते ,आरिफ भाई शेख ऊर्फ भयजान ,मयूर भोसले, विश्वदर्शन संचालक गुलाब जांभळे पत्रकार अशोक निमोकर दै नगंरी दवंडी चे पत्रकार पप्पुभाई सय्यद केबल आँपरेटर अनिल म्हेत्रे , सुलताना शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनच्या वतीने निस्वार्थ सेवेबद्दल डॉक्टर रावीदादा आरोळे व  शोभाताई आरोळे यांचा सत्कार करून सन्मानचिन्ह देण्यात आले.
यावेळी डॉक्टर शोभाताई आरोळे  यांनी या उपक्रमाचे कौतुक करून अभिनंदन केले.
मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन या मार्फत विविध सामाजिक उपक्रम घेतले जातात तसेच क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या हिताचे कार्य केले जाते व गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन व मदत  करते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here