पत्रकार दातीर हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपींना अटक करा ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 10, 2021

पत्रकार दातीर हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपींना अटक करा !

 पत्रकार दातीर हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपींना अटक करा !

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अपहरण करून पत्रकार रोहिदास दातीर यांची झालेली हत्या म्हणजे पोलिस व कायद्याचा धाक गुन्हेगारांना नसल्याचे दिसत आहे. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपींना राजकीय पाठबळ आहे. या प्रमुख आरोपींना त्वरित गजाआड करून कठोर शासन व्हावे अशी मागणी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
कर्डिले यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांचे दिनांक 6 एप्रिल रोजी राहुरी येथील मल्हारवाडी रोड वरून दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आले व त्यांची अमानुषपणे हत्या करण्यात येवून त्यांचा मृतदेह शहरातील कॉलेज रोड परिसरात आणून टाकण्यात आला. मयत दातीर यांना यापूर्वी जीवे मारण्याची धमकी देणे, हल्ला करणे असे प्रकार घडले होते याबाबत दातीर यांनी राहुरी पोलिसात तक्रार दाखल केली होती तसेच आपल्या जीवितास धोका असल्याने पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणीही केली होती. राहुरी तालुक्याच्या इतिहासात बिहार राज्याला लाजवेल अशा प्रकारची सदर घटना आहे. गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांची सामान्य नागरिकांवर दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांचा व कायद्याचा धाक राहिलेला दिसत नाही मयत पत्रकार दातीर यांनी राहुरी त्यामुळे त्यांनाही आरोपी करण्यात यावे. याबाबत महत्त्वाचे पुरावे व कागदपत्र उपलब्ध असून, तपासकामी मागणी केल्यास सादर करण्यात येतील. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्वांचा मुळाशी जाऊन तपास करावा. सर्व आरोपींना अटक करावी व त्यांना कठोर शासन व्हावे. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येील, याची नोंद घ्यावी. तसेच घटनेचा तपास पूणर्व होईपर्यंत दहशतीखाली असणार्‍या मृत दातीर यांच्या कुटुंबियांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment